पुण्यातील महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल फाऊंडेशन तर्फे

Share news

पुणे–वॅबटेक कॉर्पोरेशन आणि एनोबल सोशल इनोव्हेशन फाऊंडेशन यांनी आज पुण्यातील महाळुंगे येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण पूर्ण करून त्याचे उदघाटन केले

हा उपक्रम वॅबटेकच्या केअरिंग फॉर अवर कम्युनिटीज प्रोग्रामचा एक भाग आहे, जगभरात ज्या ठिकाणी वॅबटेक चे कर्मचारी राहतात किंवा काम करतात व अश्या ठिकाणी सामाजिक कार्यात पूर्णपणे योगदान देण्याचा वॅबटेकचा चा प्रयत्न असतो.

वॅबटेकचे इंडिया सोर्सिंगचे वरिष्ठ संचालक, विजय इनामके यांनी नूतनीकरण केलेल्या शाळेचे उद्घाटन केले. त्यांनी क्लस्टर हेड मारुंजी, सुरेश साबळे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक आनंद राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती अनिता साळुंखे, सदस्य श्रीमती सरिता मुरकुटे आणि चिराग भंडारी (एनोबल संस्थापक) यांच्या उपस्थितीत शाळेच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरण केले.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247

Leave a Comment