कुडाळचा मावळा आदित्य करणार सायकलने अवघड असा चंदेरी किल्ला काबीज.

Share news

कुडाळचा सुपुत्र आदित्य बटावले ५ जून रोजी एक अनोखा विक्रम करणार आहे. महाराष्ट्रातील अवघड असा समजला जाणारा चंदेरी किल्ला तो सायकलने चढणार आहे. हा कडा ८०० मीटर उंच असून 80 अंशांवर कललेला आहे. सामान्य माणसाला सुद्धा या किल्यावर चढाई करताना घाम फुटतो त्यात अदित्य सायकल घेऊन ही चढाई करणार आहे.

आदित्यने त्याचा या अनोख्या शैलीने ट्रेकिंग ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलय.
प्रत्येक वेळी अदित्य स्वतःला नवनवीन आव्हान देत असतो. नुकताच त्याने रायगड किल्ला सर केला.. तब्बल १५०० खडतर पायऱ्या २ तास २३ मिनिट २१ सेकंद या विक्रमी वेळेत पार करून महाराजांना मानाचा मुजरा केला.

आता ५ जून रोजी आदित्य स्वतःला एक नवीन आवाहन देत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रवास अदित्य मावळ्याच्या वेशात करणार आहे.
आदित्यला या उपक्रमात महाराष्ट्र रेंजर्स टीम मार्गदर्शन करणार आहे.

आदित्यच्या प्रवासाची रूपरेखा खालील प्रमाणे असेल.

३ जून – कुडाळ वरून ट्रेन ने पनवेल कडे रवाना.
४ जून – पनवेल वरून मावळ्याच्या वेशात चिंचवली गावाकडे प्रस्थान.
दुपारी २ च्या सुमारास महाराष्ट्र रेंजर्स टीम भेटणार तेथून ३ तास ट्रेक करत चंदेरी किल्ला गुहेकडे प्रस्थान.
रात्री गुहे मध्ये विश्रांती.
५ जून – सकाळी ७ वाजता मावळ्याच्या वेशात चढाईला सर्वात.

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment