12 वी मध्ये 90 % गुण संपादन करून तालुक्यातून पहिली आलेली कु. दिक्षा पंढरीनाथ रिंगे हिचा सक्षम ग्रुप कडून सत्कार

Share news

इयत्ता 12 वी मध्ये 90 टक्के गुण संपादन करून तालुक्यातून पहिली आलेली कु. दिक्षा पंढरीनाथ रिंगे हिची सक्षम ग्रुपने दखल घेत तिला भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

लहुळसे सारख्या दुर्गम गावातून , घरची परिस्थिती बेताचीच,अपुऱ्या दळणवळण सुविधा, मोबाईल नेटवर्कचा अभाव, कोणत्याही प्रकारचा क्लास नाही अश्या परिस्थितीत 90% गुण कसे मिळवले. त्यासाठी काय तयारी केली आणि कोणाचे मार्गदर्शन मिळाले याची सविस्तर मुलाखत लवकर सक्षम YouTube channel वर आपल्याला बघायला मिळेल आणि त्यातून नवीन विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन होईल
आई वडिलांच्या परिस्थीचीती जाणिव असेल तर पावलं चुकतं नाहीत हे दिक्षा ने सिद्ध केलं.

भविष्यात तिला अधिकारी होण्याचं स्वप्न आहे…कोणतेही ट्युशन नाही. ऊन, पाऊस, पावसात वाहून गेलेला रस्ता, अनेक महिने बदं असलेली एसटी. अशी संकटं येवून सुद्धा लहूळसे ते पोलादपूर असा अनेक किलो मिटरचा प्रवास करून इयत्ता 12 वी मध्ये 90% टक्के गुण संपादन करून तालुक्यातून पहिली आलेली *कु. दिक्षा पंढरीनाथ रींगे* हिला पुढील शिक्षणासाठी काॅलेजला जाण्या करिता एक छोटीशी मदत. तसेच हार्दिक शुभेच्छा!

संबंधित छायाचित्रे :
Local News 247 Local News 247 Local News 247

Leave a Comment