राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार दिव्यांग विभागाच्या वतीने दिव्यांग जागृती कार्यक्रमाचे आयोजन.

Share news

आज रविवार दिनांक २९/०९/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार दिव्यांग विभागाच्या वतीने मा.श्री.मदनकुमार इंगळे साहेब प्रदेश सरचिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या विविध प्रकारच्या समस्या व प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दिव्यांग जागृती कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री.अतुल भैय्या गावंडे युवा जिल्हाध्यक्ष,व समाधान सपकाळ तालुका अध्यक्ष दिव्यांग विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांचे स्वागत समारंभ करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदनकुमार इंगळे साहेब प्रदेश सरचिटणीस दिव्यांग विभाग हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजूभाऊ सपकाळ यांनी केले तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष समाधान सपकाळ यांनी केले. तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी यावर तोडगा काढून त्या सोडविण्याचा सदैव प्रयत्न केला जाईल असे आपल्या प्रास्ताविकात सपकाळ यांनी सांगितले. तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.रंगनाथ मिरगे जि.अध्यक्ष, राजेश गायकवाड जि. सचिव , किशोर जाधव, राहुल मनोहर ,राजु सपकाळ, महेंद्र तांबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मा.श्री.गायकवाड साहेब यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली,व त्या योजना मिळण्यासाठी काय करावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस माननीय श्री इंगळे साहेब आपले अध्यक्षीय भाषणात म्हणाले की दिव्यांग बांधवांनी एकजुटीने संघर्ष केला पाहिजे तरच आपले प्रश्न लवकर सुटू शकतील. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे. संघटना मजबूत करून एकजुटीने काम केल्यास त्या योजनांचा लाभ कसा लवकरात लवकर मिळतो याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास तालुक्यातील श्याम बागडे भुजंग शिंदे कारभारी खंडागळे नरेंद्र लंगडे संकेत शिंदे एकनाथ गावंडे दत्ता गावंडे सुमित मस्के इत्यादी अनेक दिव्यांग कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी समाधान सपकाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.