आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतीने डॉ सचिन रेरे यांचा सत्कार.

Share news

पालघर :सौरभ कामडी

आज सायदे वाघ्याची वाडी येथील ग्रामस्थ सखाराम रेरे सर माजी विस्तार अधिकारी.

यांचे चिरंजीव डॉ सचिन रेरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी.पदवी प्राप्त केल्या बद्दल आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व सायदे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी डॉ सचिन रेरे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देताना सांगितले की आपल्या भागातील आदिवासी मुलाने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.आम्हाला देव दिसत नाही पण वेळ आली का आजार पणा मध्ये डॉक्टर च देव असतो त्यामुळे आपण या डिग्री चा वापर समाजाची सेवा करण्यासाठी करावा अशी अपेक्षा देखील वाघ यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रल्हाद कदम यांनी सांगितले की रेरे परीवार कायमच सामाजिक क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे, डॉ.सचिन ने हा वारसा पुढे चालवला आहे.तसेच निलेश झुगरे यांनी देखील डॉ सचिन ला शुभेच्छा देताना सांगितले की डॉ सचिन चा आम्हा गावकऱ्यांना अभिमान वाटतो व आनंद देखील झाला आहे.

डॉ.सचिन रेरे यांनी मिळवलेले ल्या यशा बद्दल सर्वां कडुनच कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाला प्रदीप वाघ उपसभापती, जेष्ठ नेते प्रल्हाद काका कदम, सामाजिक कार्यकर्ते निलेश झुगरे, आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे कार्याध्यक्ष मंगेश दाते, सचिव संजय वाघ, विठ्ठल गोडे,उमाकांत हमरे, कुर्लोद उपसरपंच मोहन मोडक, सखाराम शिद, पांडुरंग वारे, प्रतिक लहामगे, देवीदास पेहरे,भारत बुधर, दिनेश पाटील,शुभम दुर्गुडे दशरथ पाटील, सुरेश पाटील,जगन झुगरे, नामदेव गिर्हे, राहुल झुगरे,देवराम कामडी, तुकाराम झुगरे, सखाराम रेरे, एकनाथ रेरे इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.