धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा.

Share news

पालघर :सौरभ कामडी

आज मोखाडा तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांना धर्मवीर 2 चित्रपटाचा मोफत शो नाशिक येथील दिव्या सिनेमा गृहात आयोजित केला होता.

शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ यांनी याचे आयोजन केले होते.महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अतिशय योग्य वर्णन या चित्रपटात दाखविण्यात आले असून नवीन पिढीला धर्मवीर दिघे साहेबांचे विचार व दर्शन या निमित्ताने घडत आहे असे प्रतिपादन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

प्रदीप वाघ यांच्या सह जेष्ठ नेते प्रल्हाद काका कदम,खोडाळा माजी सरपंच प्रभाकर पाटील, विभाग प्रमुख निलेश झुगरे, सरपंच नरेंद्र येले, सरपंच बाळु घाटाळ, उपसरपंच नंदकुमार वाघ, मोहन मोडक,पंकज शिंदे,संजय हमरे, रमेश बोटे, प्रकाश मडके, बलवान देशमुख, उमाकांत हमरे निलेश ठोमरे, अनंता वारे, पत्रकार गणेश वाघ,देवचंद जाधव,माजी सरपंच देवीदास पेहरे, दशरथ पाटील, सुरेश पाटील,अक्षय कोरडे,शुभम दुर्गुडे, दिनेश पाटील, रघुनाथ पादीर,राजा येले,भारत बुधर,भाऊ दोरे, राजेश गारे, पांडुरंग वारे,जगन झुगरे, नामदेव गिर्हे, ग्रामपंचायत सदस्य गणेश खादे या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.