अभाविप तर्फे निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण..

Share news

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा ( दे. मही ) :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देऊळगाव मही नगरच्या वतीने दि. 28/8/2024 ला घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे दि. 27 व 28/9/2024 ला सहकार विद्या मंदिर, श्री शिवाजी विद्यालय व स्वामी विवेकानंद विद्यालय या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले .. या स्पर्धेत नगरातून 5 विद्यार्थ्यांचे नाव कडण्यात आले. त्यामध्ये क्रमांक पहिला श्रीरंग एकनाथ चेके(वर्ग, 8वा ) , क्रमांक दुसरा शुभांगी सुरेश फुल्लारे (वर्ग, 9वा ) , क्रमांक तिसरा ऋतुजा समाधान शिंगणे (वर्ग, 8वा ), क्रमांक चौथा प्रगती जगदीश मान्टे (वर्ग, 10वा) , व क्रमांक पाचवा प्रिया विजय बनसोडे (वर्ग, 9 वा)

या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी अभाविप नगर मंत्री रोहित देढे, सह मंत्री हर्षल जायभाये, महविद्यालय प्रमुख ओम पाटील, दिवेश पिसे , ऋषिकेश शिंगणे, ओम बनसोडे व अभाविप कार्यकर्ते व विद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.स्वामी विवेकानंद विद्यालय येथे विद्यार्थांना मार्गदर्शन करता वेळी दिवेश पिसे म्हणाले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विरोधी लोक बोलाचे की ही काय विद्यार्थी परिषद आहे सरस्वती पूजा करतात आणि ज्या मुलांचे चागले नंबर येतात त्यांचा सत्कार करतात अस्याने कुठे संघटन होत असते का पण आज विद्यार्थी परिषद इतकी सक्षम झाली आहे की आज कोणाची हिमत सुद्धा होत नाही परिषदेचे विरोध बोलण्याची कारण विद्यार्थी परिषद पूर्व कार्यकर्त्यांनी ती मेहनत घेतली त्याचे फळ आज विद्यार्थी परिषद मिळाले.आणि विद्यार्थ्यांनी ही याच प्रकारे कोणाच्या बोलण्या वर लक्ष न देता आपल्या अभ्यासा वर लक्ष द्यावे जेणे करून त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल..!

Local News 247 Local News 247 Local News 247