राहुल नागपुरे
वरूड : तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या गव्हाणकुंड शेत शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासुन रानडुक्करांचा हौदोस वाढल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देउन या रानडुक्करांचा बंदोबस्ताकरीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. –
गव्हाणकुंड शेत शिवारामध्ये गेल्या ८ दिवसात रानडुक्करांनी जवळपास ३० ते ४० हेक्टर शेतावरील शेतकऱ्यांची पिके नष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या
शेतातील उभ्या पिकांची पूर्णतः नासाडी होत असतांना मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेतच दिसुन येत आहे. शेतकऱ्यांच्या शेत मालाची नासाडी झाल्यानंतर वनविभागाचा एकही कर्मचारी पहाणी करण्याकरिता येत नाही ही ता. प्रतिनिधी / वृत्त केसरी शोकांतिकाच आहे. जेमतेम शेतात पीक निघायला सुरवात झाली आहे. थोडे पीक मोठे झाले असता रानडुक्करेहीपीके उद्धवस्तकरतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याकडेवनविभागाने गांभीर्याने लक्ष देवुन तात्काळ उपाय योजना करणे अपेक्षित आहे. रात्रीच्या सुमारास हेच रानडुक्कर वाहनाला आडवे होऊन वाहतुकीस सुद्धा अडथळा निर्माण करतांना दिसुन येत आहे. तरी सुद्धा वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. वनविभागाने अशा प्राण्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा.
संबंधित व्हिडिओ :