सुनिल जाबर
जव्हार : पिंपळशेत ग्रामपंचायत हद्दीतील खरोंडा हेदीचापाडा ह्या दोन गावांना जोडणारा नदीवरील असलेला पूल पूर्ण पाण्यात वाहून गेल्यामुळे या परिसरात असलेली जिल्हा परिषद शाळा हेदीचापाडा येथील ५८ विद्यार्थी व शिक्षक नदीच्या याबाजूने अडकून बसले. सदर ६वी ते ८वीचे विद्यार्थी असून हे सर्व विद्यार्थी शेजारच्या पाड्यातील खरोडा (गावठाण) माडवीहरा, तसेच शौगारपाडा या गावातील होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी दुसरा पर्याय रस्ता नसल्याने जिल्हा परिषद हेदीचापाडा शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शाळेमध्येच मुक्काम करून जवळपास ५८ विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रात्रभर शाळेत मुक्काम केला.
जव्हार तालुक्यात गुरूवारी सतत पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील सर्व नदी नाल्यांना पूर आला होता. अनेक गावांना जोडणाच्या रस्त्यावर अरुंद पूल असल्यामुळे पुलावरून पाणी वाहत होते.. जव्हार परिसरात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली होती. शिरोशी गावातील तळ्यांचापाडा गावातील अनेक विद्यार्थी पुलावरून पाणी जात असल्यामुळे अडकून बसले होते. पाऊस कमी झाल्यानंतर पालकांनी व येथील नागरिकांनी विद्याथ्र्यांना घरी सोडले.
यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमळाकर भुसारा, योगेश भुसारा, शांतीबाई खुरकुटे व समस्त मंडळांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या गावातला जोडणारा हा एकमेव पर्याय रस्ता असून सदर पुलाचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा या पुलावरून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ या पुलाची पाहणी करून हा पूल उभारून द्यावा •अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केले आहे. तसेच या सतत पडत असलेल्या अतिवृष्टी मुळे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून या पुलाच्या आजूबाजूला असलेल्या शेतकन्यांची सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी येथील नागरिकांनी केली आहे सदर विद्यार्थ्यांना पाऊस कमी झाल्यानंतर येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी स्वतः विद्यार्थ्यांना पालकांना बोलावून विद्याथ्यांना सुरळीतपणे घरी सुखरुप सोडून दिले.
संबंधित छायाचित्रे: