महाराष्ट्र लोक न्यूज चैनल कार्यकारी संपादक
विलास पाटील
हिंगोली : बुलढाणा जिल्ह्यातील अपघातात हिंगोली जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू तर अनेक प्रवासी गंभीर जखमी
बुलढाणा जिल्ह्यात जळगाव कडून नागपूरकडे जाणाऱ्या हायवेवर मलकापूर या ठिकाणी रेल्वे ब्रिजवर आज पहाटे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान दोन लक्झरी बस आमने सामने धडकून अपघात झालेला आहे.
रॉयल ट्रॅव्हल्स (नागपूर ते नाशिक) बस एम एच 27 BX 44 66 आणि बालाजी तीर्थ यात्रा कंपनी (अंबरनाथ ते हिंगोली ) MH 08 9458 या बसेस आहेत.
एकूण 5 (2 महिला 3 पुरुष) मयत झाले असून जखमी उप रुग्णालय मलकापूर येथे तसेच बुलढाणा येथे ॲम्बुलन्स तसेच पोलीस गाड्यांनी रवाना करण्यात आले आहेत. मलकापूर, पोलीस निरीक्षक मलकापूर सदर ठिकाणी हजर असून मदत कार्य सुरू आहे. पोलीस अधिक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
मलकापूर शहर च्या तीन मोबाईल एमआयडीसी मोबाईल ग्रामीणचे मोबाईल कर्मचारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी मदत करीत आहेत, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांनी सांगितले,
महाराष्ट्र लोक न्यूज चैनल कार्यकारी संपादक
विलास पाटील