छावा क्रांतिवीर सेनेत शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त प्रवेश सोहळा.

Share news

आज नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती कार्यालय येथे छावा क्रांतिवीर सेनेत शेकडो तरुणांचा उत्साही प्रवेश सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर,उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,वाहतूक आघाडी शहर संपर्कप्रमुख अमोल देवरे,नाशिक जिल्हा वारकरी आघाडी संपर्कप्रमुख सोमनाथ पाटील,तसेच सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र नालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

संघटनेत तरुणांची सहभागाची संख्या दर आठवड्याला वाढत असून,छावा क्रांतिवीर सेनेच्या विचारसरणीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.यावेळी काही नव्याने सामील झालेल्या तरुणांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या,त्यात पुढील तरुणांचा समावेश आहे:

नाशिक शहर युवक आघाडी महानगरप्रमुख: नामदेव विठ्ठलराव शिंदे

कामगार आघाडी शहर सरचिटणीस: किरण रवींद्र चव्हाण

कामगार आघाडी शहर कार्याध्यक्ष: नितीन सुरेश दाभाडे

धुळे शहराध्यक्ष कामगार आघाडी: आदित्य अजित खलाणेकर

कामगार आघाडी नाशिक तालुका अध्यक्ष: गणेश एकनाथ गीते

नवीन नाशिक विभाग प्रमुख कामगार आघाडी: अमोल साहेबराव पाटील

संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि सांगितले की, “संघटनेत दर आठवड्याला शेकडो तरुण प्रवेश करत आहेत, आणि संघटनेचे विचार युवकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.दिलेल्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व ओळखून सर्वांनी संघटनेच्या हितासाठी कार्य करावे.संघटना हे आपलं घर आहे, त्याचं रक्षण आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे.”

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेत प्रवेश घेणाऱ्या तरुणांमध्ये अक्षय रंधे,राहुल ढोकोलिया,सागर गुरव,कृष्णा दवणे,ऋषिकेश भालेराव,विनय पिंगळे,तुषार पाटील,भरत महाजन आणि महाले आदींचा समावेश होता.

Local News 247