AB न्यूज मराठी लाईव्ह चॅनल मध्ये ईश्वर एकनाथ मुकणे यांची कोकण प्रमुख पदी निवड..

Share news

जव्हार : दिनेश आंबेकर

जव्हार हा ग्रामीण परिसर असून ग्रामीण परिसरातून चांगल्या पदावर जाण्याकरिता चिकाटी असावी लागते. ईश्वर मुकणे हे या भागात सामाजिक कार्य करत असून कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे.किर्तन क्षेत्रामध्ये खेड्यापासून टीव्ही पर्यन्त त्यांचा प्रवास आहे. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी पत्रकार विषयात हात घातला आणि चांगली कामगिरी केल्यामुळे चॅनल ने सांगली,मिरज येथे नुकत्याच पार पडलेल्या चॅनल च्या 4 थ्या वर्धापन दिनात कोकण प्रमुख ट्रॉफी देऊन जबाबदारी दिली.

श्री.ईश्वर मुकणे हे विविध क्षेत्रात काम करत असून अवघ्या 32 व्या वर्षात त्यांना ही जबाबदारी मिळालीय, सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक जिह्यात त्यांचा परिचय आहे.या व्यतिरिक्त तालुक्यात बालसंस्कार शिबीर,विविध विषयावर मार्गदर्शन सत्र असे अनेक उपक्रम मुकणे हे करत असतात.कोकण प्रमुख पद मिळ्याल्याने अनेक भागातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात अनेक ठिकाणाहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.त्यांचं पूर्ण कुटुंब हे निर्व्यसनी असून वडील एकनाथ बबन मुकणे यांच्या संस्कारामुळे च हे साध्य झालं.