खेळाडूंच्या योजना व सवलतींवर उदासीनता दाखवणाऱ्या क्रीडा शिक्षक व परिवेक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावी – चंद्रकांतदादा लोंढे

Share news

पिंपरी- प्रतिनीधी, पिंपरी चिंचवड महापालिकेचा व आजूबाजूच्या परिसराचा झपाट्याने विकास होत असून क्रीडा क्षेत्राचा विकास देखील तेवढ्यात झपाट्याने होणे गरजेचे आहे महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांपैकी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये क्रीडा विभाग हा एक स्वतंत्र विभाग आहे महापालिकेच्या भौगोलिक परिसरामध्ये खेळाचा प्रसार,प्रचार व जोपासना होणे हा हेतू लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रीडा धोरण जाहीर केले आहे या क्रीडा धोरणामध्ये महापालिका परिसरातील खेळाडू व नागरिकांना जास्तीत जास्त क्रीडा विषयक सेवा व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे 

पिंपरी चिंचवड महापालिका ही एक औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते तसेच ती क्रीडा नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी दर्जेदार खेळाडू घडून पिंपरी चिंचवड शहराच्या व देशाच्या नावलौकिकात भर पडावी हा उद्देश असून क्रीडा विभागातील काही कामात कसूर करणाऱ्या कर्मचारी वर्गामुळे खेळाडू खालील विषयांमुळे अडचणीत आहेत आपणास विनंती आहे की आपण तात्काळ खालील सर्व विषयांवर लक्ष ठेवून त्वरित सर्व विषय मार्गी लावावेत.

1) दत्तक योजनेतील खेळाडूंना लवकरात लवकर २०२२-२३ चा निधी वाटप करण्यात यावा.

2) दत्तक योजनेसाठी 2023- 24 जाहिरात काढून अर्ज मागविण्यात यावे.

3) पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा विभागा अंतर्गत असलेले क्रीडाशिक्षक यांना निवडणूक विभागात बदली केल्यामुळे शालेय स्तरातील खेळाडूंचे होणारे प्रशिक्षणापासूनचे नुकसान थांबवण्यासाठी त्यांना पुन्हा क्रीडा विभागामार्फत क्रीडा शिक्षक म्हणून त्या त्या शाळेवरती नियुक्ती करण्यात यावे.

4) डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदान संत तुकाराम नगर येथे महिला पुरुष युवक युवती यांना चेंजिंग रूम नव्याने तयार करून देण्यात यावे.

5) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मैदान संत तुकाराम नगर येथे खेळाच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे अॅक्वा कुलर बसवण्यात यावे.

6) सुरक्षा केबिनची झालेली दुर्व अवस्था पाहता तेथे नवीन सुरक्षा केबिन त्वरित बसवण्यात यावे.

7) दत्तक योजनेत निष्काळजीपणाने काम करणाऱ्या संबंधित अधिकारी वर्गावर त्वरित निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावे.

8) पिंपरी चिंचवड मनपाच्या ऑनलाइन वेबसाईटवर क्रीडा विषयक क्रीडा विभागाची वित्यंभूत माहिती त्वरित दुरुस्त करून देण्यात यावी. तसेच सारथी हेल्पलाइन वरील ही माहिती सुधारण्यात यावी.

9) मनपा च्या सर्वच अ ब क ड इ ग ह फ प्रभागांमध्ये क्रीडा प्रबोधनी ची स्थापना करण्यात यावी. जेणेकरून त्या त्या प्रभागांमधील खेळाडूंना येथील जवळ असलेल्या प्रभागात सहभागी होता येईल.

कार्यालयीन सात दिवसात, या पत्रावर केलेल्या व करण्यात येणाऱ्या कारवाईचा तपशील आमच्या कार्यालयास लेखी माध्यमातून कळविण्यात यावे अशी मागणी चंद्रकांत लोंढे यांनी केली आहे.