2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिल्लोड येथे..

Share news

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर 

सिल्लोड : शहरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. त्याअनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या वेरुळ सभागृहात छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेची बैठक घेतली. जिल्ह्यात पात्र महिलांपर्यंत शासकीय यंत्रणेने योजनांचा लाभ पोहोचवून महिला सशक्तीकरणाचे ध्येय्य पूर्ण करावे,असे निर्देश यावेळी शासकीय यंत्रणेला पालकमंत्री श्री सत्तार यांनी दिले दिले.      

या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, श्रीराम पाटील, केशवराव .तायडे तसेच सर्व शासकीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

Local News 247