राहुल सांगळे यांचे इंडियन आर्मी मध्ये निवड..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी येथील सुपुत्र श्री राहुल गजानन सांगळे यांची इंडियन आर्मी मध्ये नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल याची इंडियन आर्मी मध्ये निवड होताच गावांमध्ये त्याची डीजे लावून आनंद साजरा करण्यात आला. राहुल याने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे यश मिळवले आहे. राहुल याला सुरुवातीपासूनच देश सेवा करण्याची आवड निर्माण झाली होती तो दोन वर्षापासून सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. राहुल याचे वडील श्री गजानन सांगळे हे शेती करतात. त्यांनी सुद्धा राहुलला इंडियन आर्मी मध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले व त्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टीची पूर्तता त्यांनी शेतीमध्ये कबाड कष्ट करून केली. तसेच श्री गजानन सांगळे यांची मुलगी सुद्धा ही बी.डी.एस. ला आहे.

त्यांनी अत्यंत कबाड कष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले आहे. राहुल याची इंडियन आर्मी मध्ये भरती झाल्याची बातमी गावांमध्ये पसरतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.व सर्व गावकरी मंडळी यांनी त्याचे अभिनंदन केले व गावांमध्ये मिरवणूक काढली त्यामुळे नवीन मुलांना सैन्य मध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळेल.