दिवेआगर येथील समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले..

Share news

प्रतिनिधी /संदीप द्रौपदी तुकाराम लाड

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी दि.25 रोजी सकाळी 9 वाजता शासनाच्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत ग्रामपंचायत दिवेआगर तसेच पर्यटन संस्था दिवेआगर आणि दिवेआगर ग्रामस्थ यांच्या वतीने दिवेआगर समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.

पावसाळ्या नंतर पर्यटकांचा ओघ दिवेआगर येथे वाढू लागला आहे. पर्यटकांना भुरळ पाडणारा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा, सुवर्ण गणेश मंदिर , नारळ फोफळीच्या बागा हे दिवेआगर चे सौंदर्य नेहमीचं पर्यटकांच्या पसंतीस पडत असते.त्याचप्रमाणे येथील समुद्र किनारा नेहमीच स्वच्छ व सोयीसुविधा युक्त ठेवण्याचे काम येथील स्थानिक नागरिक व प्रशासन करत असते.

या स्वच्छता अभियानासाठी स्थानिक ग्रामस्थ , पर्यटन व्यावसायीक तसेच ग्रामपंचायत सरपंच , सदस्य उपस्थित होते.दिवेआगर हे पर्यटन स्थळ असल्याने या पुढे ही स्वच्छता अभियानांतर्गत समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याचे काम करत राहू अशी ग्वाही सरपंच सिध्देश कोसबे यांनी दिली.

Local News 247 Local News 247