कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत नाही – भावी आमदार शिवाजीराव कवडे पाटील 

Share news

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागात आजही नागरिकांना दळणवळणाची व्यवस्था सुरळीत नाही आजही लहान मुलांना शिक्षणासाठी जाण्यासाठी रस्ता सोईसाठी अडचणी ठरत आहे 

मग ग्रामीण भागातील मतदारांनी राजकीय दहशत निर्माण करणार्या नेत्यांना का मतदान करावे फक्त मतांसाठी हे राजकीय नेते एकदाच येतात काही तरी आमीष दाखवतात आश्वासन देतात परंतु सकारात्मक विचार ठेवून कोणतेच काम पुर्ण करत नाही

अशा वारंवार जनतेच्या निशाण्यावर राजकारण करतात मग ग्रामीण भागातील मतदारांनी यांना या पुढे मतदान करु नये

आपल्या पसंतीचा समाजातुन तिसरं नेतृत्व मान्य करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गनिमी कावा करून मतांचं गाजर या राजकीय लोकसेवक यांना देणं आवश्यक आहे.

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची या मतदारसंघात आता गरज नाही

मतदारांनी भारतीय लोकशाही चा स्तंभ म्हणून समाजातुन आपल्या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्ती वर राहणारा मतदाता यांच्या घरापर्यंत पक्का डांबरी रस्ता करणारा मतदारांच्या पसंतीचा उमेदवारांची निवड करणं आवश्यक आहे असे आवाहन मतदारसंघात मतदारांना आपण करणार आहोत

जनतेच्या संपर्कात राहणारा माणूस हा मतदारांच्या हक्काचा माणूस समजला जातो

परंतु जनतेच्या संपर्कात न राहणारा व जवळच्या कार्यकर्ता यांच्या संपर्कात राहणारा नेत्यांची निवड मतदार करणार नाही

पावसाळी दिवसात मतदारांची किती हाल होते हे राजकीय नेते यांना माहीत नाही फक्त कागदावरच निधी मंजूर प्रत्यक्ष काम पुर्ण होत नाहीत या कडे लक्ष्यवेधी ठेवणं मतदारांनी आवश्यक आहे आपण जे मत देतो त्याची किंमत राजकीय लोकसेवक यांना समजत नाही फक्त भुलथापा देणं वेळ मारून नेण कार्यकर्ता करवी दमबाजी करणं हेंच जमतं कोपरगाव विधानसभा मतदारसंघात

या पुढे मराठा आरक्षणावर जो कोणी नेता आवाज उठवेल कोणाची अडवणूक करणार नाही असा उमेदवार निवडून देण आवश्यक आहे म्हणजे , पारदर्शकता, निर्माण होईल

पारदर्शकता निर्माण झाली तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्ते सुरळीत होऊन दळणवळणाची व्यवस्था आबाधीत होईल,

अशी माहिती पञकार प्रसिद्ध साठी कोपरगाव चे भावी आमदार शिवाजीराव कवडे पाटील यांनी दिली आहे