बाळापूर येथे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू भांडे वितरण..

Share news

डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर

सिल्लोड : तालुक्यातील बाळापुर येथे विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी दिली. गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी वस्तू (भांडे ) चे वितरण ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधत असतांना ना. अब्दुल सत्तार बोलत होते.

याप्रसंगी उपस्थित माजी सरपंच तेजराव पा निंभोरे, रामचंद्र चव्हाण, बहादुरसिंग चव्हाण, दुर्गादास निंभोरे, अशोक सूर्यवंशी, प्रकाश गाडेकर,विनोद सूर्यवंशी, कबीर तडवी, सागर चव्हाण, संतोष दांडगे, गजानन वाघ ,विनोद ढवळे,राजू पाडळे, नाना चव्हाण, जितेंद्र पानपाटील ,गुलाब बर्डे, भगवान सूर्यवंशी, विनायक कल्याणकर, विशाल निंभोरे, गजानन निंभोरे, शेनफड कल्याणकर, आदी ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते,