एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा; साबळे सामाजिक प्रतिष्ठान ची महामहिम राज्यपाल यांच्या कडे मागणी..

Share news

सिल्लोड:- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा या मागणीसाठी विभागीय आयुक्त मार्फत महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच तर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की उपेक्षित अनुसूचित जातीतील थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलेले असून अण्णाभाऊ साठे यांनी निर्माण केलेले साहित्याचा खजिना हा अनमोल असून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल विदेशातील रशिया सरकारने देखील घेतलेली असून मात्र आपल्या देशाने व राज्य शासनाने त्यांना उपेक्षित ठेवलेले असून या निदान एक ऑगस्ट रोजी तरी शासकीय सुट्टी जाहीर करून त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील सर्व शासकीय तथा नियम शासकीय कर्मचाऱ्यांना या आनंद उत्सवात सर्वांना सहभागी होण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट रोजी त्यांचा जयंती महोत्सव मोठ्या आनंदात उत्सव साजरा होत असून त्यांच्या जयंतीदिनी राज्य शासनाने सुट्टी जाहीर करावी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याची चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करावी अशी मागणी मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष स्नेहल साबळे, शिल्पा आव्हाड, राधा यंगड, अंजली साबळे, कमल कांबळे, परिगाबाई शिरसाट ,संगीता आव्हाड, प्रीती साबळे,प्रमिला आव्हाड , श्रुती साबळे, यांच्यासह संचालक डॉ सचिन साबळे, पंडित आव्हाड , प्रकाश मिसाळ, संजय घोरपडे, विजय आव्हाड, संतोष थोरात,रोहित सोनवणे, ओंकार आव्हाड, प्रशांत साबळे, किरण कांबळे, कैलास घोरपडे, सखाराम आव्हाड, विशाल मिसाळ, बापू आव्हाड,शुभम आव्हाड, रंगनाथ कांबळे, आदींनी मागणी केलेली आहे.