श्री सोमेश्वर कामगार सहकारी पतपेढी लि सोमेश्वरनगर रिक्तपदी या संचालकांची झाली निवड..

Share news

संपत बनकर प्रतिनिधी

सोमेश्वरनगर:-श्री सोमेश्वर कामगार सहकारी पतपेढी लि सोमेश्वरनगर च्या रिक्तपदी झालेल्या संचालकांची निवड मा.सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे व गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बारामती सहाय्यक निबंधक ऑफिसमध्ये निवड करण्यात आली नवीन संचालकपदी खालीलप्रमाणे निवड झाली

१) श्रीमती देवांशी संतोष कापरे (महिला संचालक प्रवर्ग)

२)श्री संग्राम दत्तात्रय काकडे (सर्वसाधारण प्रवर्ग)

३) श्री राजाराम शिवराम करडे (इतर मागास वर्ग प्रवर्ग ) निवडीवेळी मा.युनियन अध्यक्ष धनंजय खोमणे , बाळासाहेब गायकवाड , तानाजीराव सोरटे, बाळासाहेब काकडे , संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरील संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर शेंडकर ,व्हॉईस चेअरमन मच्छिंद्र गवळी, हनुमंत भापकर,अजित शिंदे,राहुल सोरटे,विशाल मगर,राहुल खलाटे,जयकुमार भोसले,संजय लकडे, नानासाहेब लव्हे व सचिव महेश भोसले उपस्थित होते