हितेश वास्कर भाऊ यांनी राजकीय नेत्यांचा आवाज केला बंद ; स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेत्यांनी माझं नाव घेऊन राजकीय पोळी भाजू नये. 

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.२३,शिळफाटा ( ठाणे ) : हितेश वास्कर यांनी दिलगिरी व्यक्त करून मुंब्रा शहरातील वातावरण केले शांत हिंदू आणि इतर धर्मामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे वातावरण केले जात होते.ते आता कुठेतरी थांबणार आहे. तसेच राजकीय नेते राहुल गांधी यांच्या बद्दल काहीतरी शब्द बोलले आहेत असे मीडियावर दाखवले जात होते. त्याबद्दल ही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.मी सर्व राजकीय नेत्यांचा आदर करतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रामदास आठवले या सर्व नेत्यांचाच मी आदर करत आलो आहे. ज्याप्रकारे मला मीडियावर दाखवण्यात आला आहे.तसं माझ्या मनामध्ये कोणतीही भावना नेत्याबद्दल नाही आहे.इंस्टाग्राम वर जे आलेले कमेंट होते.ते मी वाचत होते मी वाचताना जर नागरिकांचे किंवा पदी अधिकाऱ्यांचे मन दुखावले असेल. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे हितेश वास्कर उर्फ भाऊ यांनी सांगितले. इतर समाजाबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही नाराजी किंवा क्रोध माझ्यामध्ये नाही आहे. सर्व धर्माचे माझे मित्र आहेत.ज्या प्रकारे राजकारणांनी माझे नाव घेऊन मला पुढे केले आहे.किंवा इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे जे वातावरण केले आहे.तसे माझ्या मनात कुठेही नाही आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी जी राजकीय नेत्यांनी खेळी केली होती.तिला कुठेतरी आता लगाम बसेल आणि राजकीय पोळी ही भाजणार नाही. १४ तारखेला जी कावड यात्रा संपन्न झाली त्या कावड यात्रेमध्ये भाऊ हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन नाचत होता.सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत भाऊ हा यात्रेमध्ये नाचत होता. आणि एन्जॉय करत होता.ही कावड यात्रा शंकर मंदिर पासून खिडकाली पर्यंत निघाली होती.या रस्त्यामध्ये सर्व धर्माचे पार्थना मंदिर येत असतात.जाणून बुजून एका मशीद समोर येत असलेला भाऊचा फोटो घेऊन तो राजकीय नेत्यांनी व्हायरल केला.खरंतर तो फोटो मशीद पासून पाचशे मीटर दुरीवरचा आहे.तरीसुद्धा इतर धर्माच्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे वातावरण निर्माण केले.पण मुंब्रा शहरातील नागरिक हुशार असल्यामुळे कुठलाही प्रकारची दंगल झाली नाही.नागरिक हुशार असल्यामुळे राजकीय नेत्यांचा डाव हुकला.भाऊवर गुन्हा दाखल करण्याचा ही प्रयत्न केला.त्यासाठी भाऊ यांनी मीडियासमोर येऊन जे काय सत्य आहे तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.चुकी नसतानाही हितेश उर्फ भाऊ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.याचे कारण शहरांमध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे यासाठी भाऊ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.असे भाऊ म्हणाले कोणताही राजकारणात नसताना सुद्धा राजकारण केले गेले.भाऊ साठी सकल हिंदू समाज हा उभा राहिला.भाऊ यांनी सकल हिंदू समाजाचे आभार मानले.