पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनांने माता रमाई स्मारकाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा – युवराज दाखले

Share news

पिंपरी -प्रतिनिधी, गेल्या अनेक वर्षांपासून त्याग मूर्ती माता रमाई यांचे स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पिंपरी लगत उभारण्याच्या संदर्भात बहुजन समाजातील विविध संघटनेचे प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने मोर्चे आंदोलने करत आहे.

परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून तात्काळ अंमलबजावणी केली जात नाही.

बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे भीमसृष्टी पाठीमागील नियोजित जागेत स्मारक व्हावे यासाठी बौद्ध समाज बांधव राजू गायकवाड व रामभाऊ ठोके हे 19 सप्टेंबर 2024 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत.

सोमवारी 23 सप्टेंबर 2024 रोजी पाचव्या दिवशी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व चिंचवड विधानसभा अध्यक्ष शिवाजी खडसे यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा पाठिंबा दिला.