केतूल सोनिगरा याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन ; चौकशीसाठी समिती नेमणार..

Share news

पिंपरी – प्रतिनीधी ,दिनांक २१/०६/२०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजता श्री . केतूल सोनिगरा यांनी सर्व्हे न १२४/१ , काळाखडक येथे दलित वस्तीमध्ये येऊन एसआरए ला विरोध करू नका म्हणून महिलांना धमकावले . अश्लील व अर्वाचं शब्दात शिवीगाळ केली होत. त्याबाबत काळाखडक बचाव संघर्ष समितीचे स्थानिक महिला व नागरिक यांनी २१/०६/२०२४ रोजी वाकड पोलीस स्टेशन याठिकाणी गेले होते . परंतु वाकड पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता आम्हाला त्यावेळी लेखी अर्ज देण्यास सांगितले त्यानुसार नागरिकांनी वाकड पोलीस स्टेशन याठिकाणी दि २६/०६/२०२४ रोजी तक्रार दिलेली होती . परंतु वाकड पोलिसांनी बिल्डरला पाठीशी केतूल सोनिगरा याच्यावर कारवाई न केल्याने दि २३/९/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय याठिकाणी काळाखडक बचाव संघर्ष समितीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार होते . 

या आंदोलनाची दखल घेत , सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी स्वतः काळा खडक येथील नागरिकांची वाकड पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित केली. आंदोलकांशी सविस्तर चर्चा करून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या . यावेळी नागरिकांनी सांगितले की , बिल्डरचे गुंड प्रवृत्तीचे लोक रात्रीच्या वेळी जोर जबरदस्ती घरामधे घुसून ,धमकावून ताबा पावती व स्टॅम्प पेपर सह्या करण्यासाठी भाग पाडत आहेत. घरे पाडण्याची धमकी देत आहेत. यावेळी सदर प्रकरणात चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमून संबंधितांवर कारवाई करण्याचे अश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिले . त्यामुळे काळाखडक बचाव संघर्ष समिती च्या वतीने होणारे उद्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी अपना वतन संघटनेचे महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , कार्याध्यक्ष हमीद शेख , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , विकास पांडागळे , गुरु जाधव , कयूम पठाण , दादा अरब , सोमनाथ देवकर यांच्यासह काळाखडक बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते व स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येयने उपस्थित होते .

Local News 247

दरम्यान या आंदोलनास व काळाखडक बचाव संघर्ष समितीला व अपना वतन संघटनेच्या या जनहिताच्या कामासाठी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा पाठींबा संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी दिला आहे.

काळाखडक बचाव संघर्ष समिती