आरोहण व सिमेन्स यांच्या विद्यमाने वावर आश्रमशाळेत विज्ञान प्रदर्शन..

Share news

जव्हार : सुनिल जाबर

आरोहण प्रकल्प व सिमेन्स यांच्या विद्यमाने नुकतेच भव्य विज्ञान प्रदर्शन प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर येथे गुरुवारी रोजी पार पडले.

प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ५९ उपक्रम,विज्ञान खेळणी तयार करून प्रदर्शनात मांडणी करण्यात आली होती. प्रत्येक उपक्रमाविषयी विद्यार्थी व गावातील नागरिकांना त्यांचे महत्त्व पटवून सांगितले .सदर प्रदर्शनास आरोहण प्रकल्पाचे सीइओ अमित नारकर,मॅनेजर कौस्तुभ घरत तसेच जि.प.पालघर सदस्या मनीषाताई बुधर,वावर – वांगणी ग्रामपंचायत येथील उपसरपंच रमेश बीज ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सखाराम बुधर व शाळेचे मुख्याध्यापक मनोहर रणधीर ,सोळुंके यांच्या उपस्थित संपन्न झाले सदर प्रदर्शन यशस्वितेसाठी व नियोजन करणे यात आरोहण प्रकल्पाचे कोमल चौधरी,पवार विज्ञान शिक्षक श्री. दत्तात्रय पाटील ,श्री बर्डे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे व सहकार्य लाभले.