जिके एनर्जी सौर कंपनी कडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे पाच महिने पैसे भरूनही अद्याप सौर पंप फिट केला नाही?

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये सौर पंप स्थापित करण्यासाठी एप्रिल २०२४ मध्ये जिके एनर्जी मार्केटिंग प्रा लि कंपनी कडे २२९७१ रूपायांचा भरणा करूनही अद्याप सदर कंपनीने या शेतकऱ्यांच्या शेतावर सौर पंप बसविला नाही सदर कंपनी प्रतिनिधी कडे शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क केला असता फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सदर कंपनीची तक्रार महा उर्जा कार्यालय अकोला यांच्याकडे केली असून या कंपनीवर कारवाई ची मागणी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की किनगाव राजा येथील शेतकरी राजेंद्र विजयसिंह राजेजाधव यांच्या शेतातील कपाशी,सिताफळ,व सिडस कंपनीचे पलाॅट ची लागवड केली आहे.

मात्र पावसाअभावी व विजेअभावी सदर पिके ही सुकत आहे जर या फळपीक व सिडस यांना तात्काळ पाणी दिले नाही तर मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे सदर शेतकरी यांनी जिके एनर्जी कंपनी कडे १८ एप्रिल २०२४ रोजी सौर पंप स्थापित करण्यासाठी २२९७१ रूपयांचा भरणा करूनही सदर पाच महिने उलटले तरी कंपनीने अद्याप या शेतकऱ्यांच्या शेतावर सौर पंप बसविला नसल्याने या शेतकऱ्यांनी जिके एनर्जी कंपनीच्या प्रतिनिधींना वारंवार संपर्क केला असता तो प्रतिनिधी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या शेतकऱ्यांनी जिके एनर्जी कंपनीच्या विरोधात महाउर्जा कडे तक्रार नोंदवली असून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे

सदर शेतकऱ्यांनी ही तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असून सदर कंपनीला काळया यादीत टाकण्याची मागणी केली आहे