भांगवाडी (चासोळे) येथे वीज पडून एक महिलेचा जागीच मृत्यू व तीन महिला जखमी..

Share news

मुरबाड ( शंकर करडे ) : मुरबाड तालुक्यातील टोकडा परिसरा मध्ये पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली आहे विजांच्या कडकडासह पाऊस सुरू असताना भांगवाडी चसोळे येथील रुक्मिणी बाई गोपाळ मेंगाळ वय 40 त्यांच्यावर वीस कोसळल्याने त्या मृत्युमुखी पडल्या तसेच नंदा गुलाब मेंगाळ,

हेमी अनंता लोभी,हौशाबाई जैतू हिंडोळा वरील तीन महिला जखमी झाल्या आहेत 

ही घटना 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.45 वाजता वादळ पाऊस असल्या दरम्यान घरा मध्ये चार महिला आणि दोन पुरुष सर्व जण बसले असताना घटना घडली

जखमीना ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथे उपचार

सुरु आहे या घटनेची माहिती मिळताच प्रकाश पवार शिवसेना तालुका प्रमुख, संजय पवार माजी जि प सदस्य, अनिल घरत माजी प स सदस्य, समाजसेवक बंडूशेठ पवार यांनी मदत केली