जिल्हा परिषद कन्या शाळा नेरपिंगळाई च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी विलास खासबागे..

Share news

मोर्शी प्रतिनिधी प्रमोद घाटे : जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक कन्या शाळा नेरपिंगळाई येथे शाळा व्यवस्थापन समिती निवडीसाठी पालक मेळावा आयोजित केला होता मेळाव्यात बहुसंख्य पालक उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विलास खासबागे माजी सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे होते सर्व प्रथम पालकांनमधुन सर्व संमतीने १३ सदस्य निवडल्या गेले त्या मध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधीत्व मिळेल याची काळजी घेण्यात आली त्याच प्रमाणे एस सी,एन टि,एस टी, ओबीसी,व एस बि सी या प्रवर्गातील पालकांना सदस्य म्हणून स्थान मिळेल यासाठी आरक्षण काढले होते निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पार पडली सर्व नवनिर्वाचित सदस्यांनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

पालक मेळावा संपल्यानंतर पालकांमधुन निवडलेल्या सदस्यामधुन अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली अध्यक्ष पदासाठी विलास खासबागे हे तेरा पैकी नऊ मते घेऊन विजयी झाले तर उपाध्यक्ष पदी दिनेश पातूरकर हे आठ मते घेऊन निवडून आले अशा पद्धतीने विलास खासबागे हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा विराजमान झाले असून त्यांचें सर्वत्र अभिनंदन होत आहे संपुर्ण मेळावा व निवडप्रक्रिया मुख्याध्यापिका पुष्पा यावले यांच्या देखरेखीखाली पार पडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन योगिता बेराड यांनी मानले यामध्ये सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

Local News 247