शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी दिवा तर्फे बदलापूर शहरांमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध! गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या! 

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. २१, दिवा (ठाणे) : आज दिवा शहरात दिवा स्टेशन परिसरात सायंकाळी पाच वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी दिवा शहर तर्फे बदलापूर शहरामध्ये आदर्श शाळेत दोन चिमुकल्यावर सफाई कर्मचाऱ्याकडून घडलेल्या लैंगिक अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला. या घटनेचा राजकारण करण्यापेक्षा पिडित्यांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊया.

बलात्काऱ्याला दहशतवाद्या सारखी वागणूक द्या! लाडकी बहीण नाही तर सुरक्षित बहिण योजना द्या! एका रात्री सरकार बदलू शकतं, एका रात्री नोटबंदी होऊ शकते, एका रात्री लॉकडाऊन होऊ शकतं, एका रात्री ३७० कलम रद्द होऊ शकतं, मग एका रात्री बलात्कार करणाऱ्यांना फाशी का होऊ शकत नाही. मंदिर, शाळा, रेल्वे स्टेशन, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत. काही दिवसात घरात घुसून महिलांवर अत्याचार होतील तेव्हा राज्य सरकार याची दखल घेणार का? महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना सुद्धा अशा घटना होत आहे. पोलीस प्रशासन महिलांच्या तक्रार घेण्यासाठी बारा बारा तास लावत आहेत. पंतप्रधानाचे आदेश असून सुद्धा राज्य सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो कायदा होता तो अमलात आणा आणि भर चौकात नराधमाना फाशी द्या, तुम्हाला जमत नसेल तर आमच्या महिलांच्या हातात त्या नराधमाना द्या? नाहीतर गृहमंत्री यांनी राजीनामा द्या? महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहिला नाही यावरून दिसून येत आहे. महिलांनी घरातून निघायचे का नाही? मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? कामधंद्यासाठी बाहेर निघायचे की नाही.असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे राज्य सरकार जागे व्हा! मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना अशा घटना घडल्या नाही. कायद्यात बदल करा नाहीतर अशा घटना कायम होत राहतील.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर महिला आघाडी तर्फे आज महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे या आंदोलनात सहभागी माजी आमदार सुभाषजी भोईर साहेब महिला संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे माजी नगरसेविका अंकिता पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक शहर समन्वयक प्रियंका सावंत उपशहर संघटक प्रवीण उतेकर समस्त शिवसैनिक विभाग प्रमुख शाखाप्रमुख महिला आघाडी दिव्यातील महिला माता भगिनी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Local News 247 Local News 247 Local News 247