बदलापूर शहरात दोन चिमुकलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, ज्येष्ठविधीन्य उज्वल निकम यांची नियुक्ती, सुरक्षित बहीण योजना द्या, नराधम आरोपीच वकील पत्र घेण्यास वकिलांचा नाकार..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.२१, बदलापूर (ठाणे) : बदलापूरच्या आदर्श विद्यालयातील तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीने ए आई मला शुच्या जागी मुंग्याच चावत आहेत म्हटल्यावर आईने दवाखान्यात नेले तेव्हा कळाले की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने चिमूरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचे बळी बनवले. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना व्हायरल होताच संपूर्ण बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले.संतप्त नागरिकांनी रेल्वे ट्रॅक उतरून रेल्वे रोको केला. आणि आरोपीला तात्काळ फाशावर लटकवण्याची मागणी केली. मात्र. प्रशासनाने या प्रकरणाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवले आहे. १३ ऑगस्ट रोजी सदर घटना घडली मात्र ती अशा तऱ्हेने बंड डब्यात ठेवण्यात आली. की ती लोकापर्यंत यायला २० ऑगस्ट २०२४ तारीख उजाळावी लागली. यावरून येथील प्रशासन यंत्रणा किती जलद गतीने कार्य करीत आहे. आणि आरोपांना मोकाट सोडवण्यासाठी काम करीत आहे का? असा सवाल आज बदलापूर शाळेतील जमलेल्या पालक वर्गांनी केला आहे.

आरोपीला तात्काळ फासावर लटकवा या मागणीसाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रचंड आंदोलन करण्यात येत होते. पोलिसांनी आंदोलकाना वारंवार विनंती करून देखील आंदोलक माघार घेण्यास तयार होत नव्हते. आंदोलकांनी जवळपास ९ ते ११ तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. अखेर पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. यावर आंदोलनकांकडून दगडफेक झाली. पण पोलीसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पोलिसांच्या लाठी चार्ज नंतर काही आंदोलक जखमी झाल्याची ही माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचं स्वरूप आला आहे. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं. पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आलं.

बदलापूर रेल रोको आणि आंदोलन प्रकरणात जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड करणे. तसेच पोलिसांवर दगडफेक करणे यासारख्या गंभीर गुन्हामध्ये अटक करण्यात आलेल्या ३२ आंदोलनकर्त्यांना आज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. काल रात्री उशिरा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात ३०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

तू अशाच बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे बदलापूरचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे

बदलापूर प्रकरणी एक महिला पत्रकार वार्तांकन करत असताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी घाणेरडी भाषा वापरले आहे. तू अशाच बातम्या देत देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. असा वादग्रस्त विधान वामन म्हात्रे यांनी केला आहे. म्हात्रे यांच्या विधानामुळे पत्रकारांचे संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. अत्याचाराच्या गंभीर घटनेनंतर जन उद्रेक होईपर्यंत ढिम्म राहिलेले वामन म्हात्रे या ( शिवसेना एकनाथ शिंदे गट) नेत्याने महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी असभ्य भाषेत केलेल्या विकृत शेरबाजीचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध करत आहे. तुम्ही वार्तांकन असे करता की जणू आत्याचार आपल्यावरच झाला आहे. असे कमालेची हीन वक्तव्य वामन म्हात्रे यांनी पत्रकार मोहिनी जाधव यांना उद्देशून केले आहे. वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याच्या मुंबई मराठी पत्रकार संघ निषेध करीत आहे. वामन म्हात्रे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करीत आहे. :अध्यक्ष संदीप चव्हाण

बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधाम अक्षय शिंदेला पोलिसांनी आज कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्ट पर्यंत वाढ केले आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नाकार दिल्याचे कळत आहे. कल्याण न्यायालयातील वकीलांनी त्याच वकीलपत्र घेण्यास नाकार दिला आहे.

असे आरोपी समाजात वावरणे घातक: वकील

बदलापूरचं कृत्य निंदनीय आहे. जनावरांना ही लाज वाटेल असं आहे. ज्या मुलीला काही कळत नाही ज्याच्या अंगा खांद्यावर खेळण्याचे वय आहे. अशा साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अतिप्रसंग करणे घातक आहे. असे आरोपी समाजात वावरणे हे समाजासाठी घातकच आहे. त्यामुळे असे आरोपी तुरुंगातून बाहेर येऊ नये. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या संघटनेने असं ठरवलं आहे की त्यांचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं पण आम्ही वकिलांनी त्यांचा वकीलपत्र घेतले नाही. असे वकिलांनी सांगितलं

ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती

बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या खटला चालवण्यासाठी जेष्ठ विधीन्य उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

खटला जलद गती न्यायालयात उपमुख्यमंत्री

बदलापूर अत्याचार प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाद्वारे चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहे. तसेच हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

सुरक्षित बहीण योजना द्या! 

आंदोलनात महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. राज्यात सुरू असलेल्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचार सरकार कडून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मात्र. लाडकी बहीण योजना नको. सुरक्षित बहिण योजना द्या अशी मागणी करणारे फलक बदलापूरकरांनी यावेळी झळकवले.