होमगार्ड भरती नेमकी कोणासाठी? आप शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांचा सवाल..

Share news

पुणे : पुणे महाराष्ट्र मध्ये होमगार्ड भरती प्रक्रिया चालू आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 20 वर्ष ते 50 वयोगटची अट ठेवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे उंची 162 छाती 76 से. मी धावणे 1600 मिटर महिला उंची 150 धावणे 800 अशी ठेवण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया पाषाण रोड ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या ग्राउंड वरती दी. 11.08.2024 पासून चालू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये धावणे 20 वर्षाच्या मुलाला आणि 50 वर्षाच्या माणसांना काही एक फरक केलेला नाही.

शारीरिक दृष्ट्या दोघांमध्ये खूप मोठी तफावत ग्राउंड मध्ये दिसून येत आहे. अशीच तफावत प्रशांत कांबळे यांच्या बद्दल घडली आणि त्यांनी आक्षेप घेण्यात येतोय शारीरिक दृष्ट्या वयानुसार वेगवेगळ्या असतात.यामध्ये जी मुलं पुढं आली त्यांचे वय 35 च्या आतील असून मग 50 वयोगट टाकण्याची आवश्यकता काय होती असा प्रश्न उद्भवतो होमगार्डचा हेतू प्रशासनाला मदत करण्यास तो हेतू साध्य होताना दिसत नाही. जी नव्याने भरती होत आहेत ती मुले पोलीस भरतीमध्ये याच हेतूने आलेली आहेत मग नेमका प्रश्न उद्भवतो ही भरती कोणासाठी आणि कशासाठी का फक्त भरती प्रक्रियेचं नाटक करायचं असा प्रश्न मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही.डॉ. बी.के. उपाध्याय I.P.S. मा. श्री प्रभात कुमार I.P.S पोलीस महासंचालक आणि कमांडंट जनरल होमगार्ड यांना पत्र व्यवहार करू 35 वर्षा वरील विद्यार्थ्यांसाठी धावणे,गोळा फेक अटी शिथिल करावे पत्र पाठवण्यात येणार आहे.

Local News 247