माता भगिनी साठी राज्यात लाडली सुरक्षा योजना राबवा – साबळे प्रतिष्ठानची मागणी.

Share news

सिल्लोड :- देशामध्ये व राज्यामध्ये सध्या माता भगिनी सुरक्षित नसून माता भगिनीची सुरक्षा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने माता भगिनी लाडली सुरक्षा योजना राबविणे नितांत गरजेचे असून महिलांच्या सुरक्षेसाठी गह विभागाने तात्काळ निर्णय घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी करण्यासाठी स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्य करणाऱ्या मातोश्री गयाबाई साबळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्नेहल साबळे यांनी राज्य शासनाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेले असून सध्या महाराष्ट्र राज्यभर शासनाच्या वतीने अनेक नवनवीन योजना राबविण्यात येत असून परंतु या योजना राबवत असताना तितकीच 21व्या शतकामध्ये माता भगिनीची सुरक्षा देखील नितांत गरजेचे असून देशात तसेच राज्यामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असून ज्याप्रमाणे नुकतीच शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना चा शुभारंभ थाटामाटा झालेला असून राज्यातील माता भगिनींना स्वसंरक्षणासाठी हत्यार वापरण्याचा अधिकार महिलांच्या सुरक्षेसाठी देण्यात यावा.

विशेष बाब म्हणून अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून मातोश्री गयाबाई साबळे प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्नेहल साबळे,शिल्पा आव्हाड, अंजली साबळे, संगीता आव्हाड, माहेश्वरी साबळे, राधा यगड, कमल आव्हाड, निर्मला यगड प्राजक्ता सोनवणे, राणी आव्हाड, प्रमिला आव्हाड, प्रीती साबळे, चंद्रकला आव्हाड, संगीता आव्हाड, कविता साबळे, श्रुती साबळे, प्रियंका सोनवणे. आदींनी मागणी केली आहे