युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य व पोलिस बाॅईज संघटना महाराष्ट्र राज्य याच्यावतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची मागणी..

Share news

युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य व पोलिस बाॅईज संघटना महाराष्ट्र राज्य याच्यावतीने बदलापुर,कलकत्ता,संभाजीनगर,नवी मुंबई उरण येथील युवतीवर व साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्यां आरोपीना फास्ट ट्रॅक न्यायालयात दावा दाखल करून तातकाळ फाशीची शिक्षा करण्याची तरतुद मा.राष्ट्रपती मा.न्यायालय मा.मानवी हक्क आयोग व केंद्र व राज्य सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारून योग्य तो भारतवासिंयाना अपेक्षित असलेला निकाल घेण्यात यावा.असे निवेदना द्वारे *मा.श्री तुकारामभैय्या उर्फ सुरजभैय्या खांडेकर संस्थापक अध्यक्ष व पोलिस बाॅईज संघटना जिल्हाध्यक्ष प्रकाशभैय्या गायकवाड व आंबेडकरी चळवळीतील आयुष्यमान एल.एम निकाळजे व आमचे मार्गदर्शक व सहकारी मिञ नंदकुमार मोरे व इतर मान्यवर* उपस्थित होते.

बदलापुर येथील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत शिशूवर्गात शिकत असलेल्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर शाळेतील एका कर्मचाऱ्यांने या दोघीवर लैंगिक अत्याचार केला आहे.ही नक्कीच हादरवून टाकणारी स्थिती आहे.यानंतर शाळेतही आणि नकळत वयातही मुली सुरक्षित नाहीत ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.या निर्दयी आणि राक्षसी वृत्तीच्या इसमावर योग्य ती कारवाई तसेच संभाजीनगर येथील पुजा पवार लव्ह जिहादच्या जाळ्यात फसत नाही म्हणून शरीयावादी कासिम पठाण ने इतका ञास आणि धमक्या दिल्याने शेवटी कंटाळून पुजा पवार या हिंदू ताईने एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केली.

तसेच अक्षता म्हाञे या तरुणीवर सुद्धा मंदिरात पुजा करत असताना मंदिरातच भोंदू पुजार्‍याने लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे.तसेच कलकत्ता येथील डाॅक्टर मुलींवर सुध्दा लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे.तसेच नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदे मुलीवर लव्ह जिहाद दाऊद शेख या नराधमांनकडून तिचे हात पाय कापून तिच्या गुप्तागावर वार करून तिची हत्या करण्यात आली आहे.

आपणांस विनंती करतो की या सर्व ताईना योग्य न्याय मिळवून द्यावा महाराष्ट्रात असे प्रकार घडत राहिले तर मुली व महिला घरातून सुध्दा बाहेर पडणार नाहीत.या सर्व घटनेचा आम्ही युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने निषेध करून या सर्व वरील सर्व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा तसेच फाशी देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो.या सर्वच प्रकारणाची गंभीरता समजून कठोर कायदे करण्यात यावेत.नाहीतर या घटनाचा सपाटा फोफवतच जाईल आम्ही अशी विनंती करतो.

Local News 247 Local News 247 Local News 247