नाग पंचमी निमीत्त श्री.नवनाथ एकनाथ ठाकुर यांनी रचलेली कविता

Share news

शीर्षकः ‘नागपंचमी’

भारतीय संस्कृती असे महान।

जेथे उत्सवांचा होतो सन्मान।।

 

श्रावणातला पहिला उत्सव

‘नागपंचमी’ असे ज्याचे नाव,

नागाची पूजा करण्यासाठी

वारूळाजवळ जमतो गाव.

नागाची गाणी म्हणती छान।

जेथे उत्सवांचा होतो सन्मान।।१।।

 

जेथे पशू- पक्षांचीही पूजा होते

तेथे पोळा, कोकिला व्रत होते

वट आणि श्रावणी पौर्णिमा ही

कृतज्ञतेची पर्वणीच दिसते

मानव-निसर्गाचे गाऊ गुणगान।।

जेथे उत्सवांचा होतो सन्मान।।२।।

 

‘नाग’ करी मज शेतीचं रक्षण

म्हणूनि त्यास म्हणती रक्षक

कृतज्ञतेने पूजती नागदेव

शेतीसाठी बनला तो भक्षक

वर्षातून नागाला मिळतो मान।।

जेथे उत्सवांचा होतो सन्मान।।३।।

 

‘नागाला’ सुंगध फारच आवडती

चंदन, केवडा तेथे त्याची वसती

सदगुणांचा सुगंध मानवी मनात

आत्मानंद तेथे जीवनातआणती

नागाच्या गुणांचे करी गुणगान।।

जेथे उत्सवांचा होतो सन्मान।।४।।

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑

 ✍️श्री.नवनाथ एकनाथ ठाकु

  खिडकाळी-ठाणे

   📞9833584052