नाग पंचमी निमित्त महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.२१, शिळफाटा ( ठाणे ) : शिळगावातील महाकालेश्वर मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. आज नागपंचमीचा दिवस असल्यामुळे भक्तांनी सकाळीच पाच वाजल्यापासून महाकालेश्वर मंदिरामध्ये रागेमध्ये उभे राहून दर्शनासाठी लाईन लावली. हे मंदिर १५० ते २०० वर्षापूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिरामध्ये नागदेवता भक्तांना काही वर्षांपूर्वी दर्शन देत होते. आजी काही भक्तांना नागदेवतांचे दर्शन होतात. आजी मंदिराच्या परिसरामध्ये नागदेवता पाहायला मिळतात. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतीकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. श्रावण महिना सुरू झाला आहे. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तसेच नागपंचमीचा सण आहे. श्रावण महिन्यात सोमवारला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिक्रमक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. यंदाच्या नागपंचमीला शुभमुहूर्त आहे. नागाची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.यंदा नागपंचमीचा सण आज म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात, काही भागात चिखलाचा नागदेवता करतात, तर काही ठिकाणी प्रतिकात्मक फोटोची पूजा करतात, काही ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा करतात, सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावात जिवंत नागाची पूजा करतात.

Local News 247

हिंदू दिनदर्शिका नुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी पंचमी किती २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.२१वाजता सुरू होईल. आणि पंचमी तिथी २२ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता समाप्त होईल. नागपंचमीच्या पूजेची वेळ पहाटे ५.५३ते ८.३० मि. अशी आहे.

 

नागपंचमीला नागदेवतेची पूजा कशी करावी. 

Local News 247

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष पूजेसोबत राहून दोषाची पूजा करता येते पंचमीला दिवसभर उपास करून संध्याकाळी भोजन करावे नागपंचमीच्या दिवशी लोक भिंतीवर नागाचा आकार करून पूजा करतात त्यानंतर नागदेवतेला आवाहान करावे त्यांना हलद लाह्या, तांदूळ, केळी, दूध नारळ आणि घुगऱ्या घालून. टिळक लावावा फुले अर्पण करावी. उदबत्ती करावी. आणि कच्च्या दुधात साखर मिसळूनं नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर नागदेवतेची आरती करावी.