घणसोली गावठाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई कनिष्ट अभियंत्याचे घुमजाव संवाद सोशल मिडीयावर व्हायरल – नागरिकांचे आयुक्तांना साकडे

Share news

ठाणे : विनोद वास्कर, रमेश राऊत

दि.२१,नवी मुंबई (ठाणे): शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची कोट्यावधी रुपये खर्चून मोरबे धरण घेतले. आणि तेव्हापासून संपूर्ण शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली. असे असतानाही घणसोली गावातील काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची लेखी तक्रार येथील रहिवाश्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली आहे.दरम्यान एका ग्रामस्थाने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याबद्दल घणसोली विभागाच्या कनिष्ट अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे देवून वेळ मारून नेली.हा संवाद सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी आयुक्तांना साकडे घातले आहेत.

Local News 247

गतवर्षी हे मोरबे धरणात सध्या ९० टक्के पाणीसाठा असून ८६ मीटर अशी पाण्याची पातळी आहे. असे नवी मुंबईतील गावठाणात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या घणसोली गावात मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. घणसोली परिसरात अनेकांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदल्या आहेत. तर अनेक परिसरात ट्रंकर ने पाणीपुरवठा केला जात असल्याचे ताजे उदाहरण आहे. पाणी टंचाई चे गांभीर्य लक्षात घेवून घणसोली गावातील अनिकेत पाटील नावाच्या युवकाने घणसोली एफ विभागाचे पाणी पुरवठा कनिष्ट अभियंता नितीन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “ तुम्हांला माझा मोबाईल नंबर कोणी दिला, पाणीपुरवठा कुठून होतो, जर मला मोरबे धरणातून दहा लोकांचे मिळण्या ऐवजी केवळ पाच लोकांचे पाणी पुरवठा झाले तर पाच लोकांना सोडणार , मग पाणी सोडणारे कोण मोरबे धरणाचे संबंधित कर्मचारी असताना त्यांना का विचारात नाहीत. असे प्रत्युतर देत या अभियंत्याने आपली जबाबदारी झटकून दिली. यासंदर्भातील संपूर्ण संभाषण सध्या नवी मुंबई परिसरात सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. असे असतानाही पाणीपुरवठा विभागातील अशा कनिष्ट अभियंत्याची दबंगिरी घणसोलीत सुरु असूनही महापालिकेच्या वरिष्टांकडून कारवाई होत नाही.

घणसोली गावातील काही ठिकाणी दिवसातून एकदाच तेही अर्धा ते एक तास कमी दाबाने सोडले जात असल्यामुळे पुरेसे पाणी भरू शकत नसल्याची त्यांची तक्रार आहे.पाणी पुरवठ्याची निश्चित वेळ असूनही जाहीर करण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात कमी दाबाने पाणी सोडले जात असल्यामुळे महापालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला जात आहे. महापालिकेच्या या धरणातून शहरातील पाणीपुरवठय़ासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते, आणखी २ मीटर पातळी वाढल्यानंतर संपूर्ण धरण पूर्ण भरल्यानंतर नोड्स आणि गावठाणातील नागरिकांना कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याची माहिती मोरबे धरण प्रकल्पाकडून देण्यात आली होती.असे असूनही पाणी टंचाई च्या झळा येथील हजारो गृहिणीना सोसाव्या लागत आहेत.

घणसोली विभागात पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चुकीच्या नियोजन पद्धतीमुळे गेल्या दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या उद्देशाने प्रत्येक विभागात ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत किती दाबाने पाणीपुरवठा होतो कि घरगुती वापराच्या फुटलेल्या जलवाहिन्यामधून पाणी गळती होते कि नाही, याची पाहणी करण्याची पालिकेच्या अधिका-यांची जबाबदारी असूनही त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे या रहिवाश्यांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर तसेच शहर अभियंता संजय देसाई यांच्याकडे घणसोली पाणी टंचाई संदर्भात सोमवारी २८ ऑगष्ट रोजी बैठक रोजी महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. याप्रकरणी शहर अभियंता संजय देसाई यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते अत्यंत महत्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे बोलणे होऊ शकले नाही. दरम्यान नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देणा-या संबंधित कनिष्ट अभियंत्यांवर कारवाई होणार कि नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी ) आणि नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून दररोज संपूर्ण शहराला ४४९.०६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. महापालिकेच्या आठ विभागात दररोज होणारा एमएलडी पाणीपुरवठा पुढील प्रमाणे –

सीबीडी बेलापूर -६८.२५ एमएलडी

नेरूळ – ७४.३८ एमएलडी

तुर्भे –७७.६५ एमएलडी

वाशी –५०.३७ एमएलडी

कोपरखैरणे –६०.०९ एमएलडी

घणसोली –६८.१३ एमएलडी

ऐरोली –३६.०९ एमएलडी

दिघा – १४.१० एमएलडी असा नवी मुंबई नोडस आणि गावठाणात एकूण ४४९.०६ एमएलडी पाणीपुरवठा होत असूनही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या घणसोली गावठाणात मात्र पिण्याच्या पाण्याचा ठणठनाट आजही कायम आहे.