ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सलंग्न संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने सामूहिक श्रावणी आयोजन संपन्न

Share news

ठाणे : विनोद वास्कर, रमेश राऊत

दि.२१ डोंबिवली (ठाणे) : रविवारी २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७ वाजता डोंबिवली मध्ये कऱ्हाडे सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल टिळक नगर डोंबिवली पूर्व येथे ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्था याच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक श्रावणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था ( देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली ) तसेच पुरोहित मंडळ ( डोंबिवली पूर्व ) आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे करण्यात आले होते. कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ७ वाजल्या पासून करण्यात आले होते. एकूण २२५ पेक्षा जास्त सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमात भाग घेतला होता. ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली. ब्राह्मण समाज एकत्रिकरण दृष्टीने महत्वाचे पाऊल हे ब्राह्मण महासंघा तर्फे डोंबिवली मध्ये रोवण्यात आले. भविष्यात अश्या प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन हे ब्राह्मण महासंघातर्फे डोंबिवली मध्ये भविष्यात निश्चित करण्यात येणार असून. त्यामुळे ब्राह्मण समाजाची ताकद ही अधिक प्रमाणावर वाढण्यास मदत होईल असे. ब्राह्मण महासंघ, डोंबिवली चे अध्यक्ष मानस पिंगळे ह्यांनी सांगितले.

श्रावणी हे श्रावण महिन्यात का केली जाते व त्याचे महत्व काय

श्रीः

श्रावणी का केली पाहिजे

प्रत्येक ब्राह्मण व्यक्ती ने श्रावणी केलीच पाहिजे.

स्वाध्यायेन व्रतैर्होमैस्त्रैविद­

्येनेज्यया सुतैः

महायज्ञैश्च यज्ञैश्चब्राह्मीयं क्रियते

तनुः

( वेदाध्ययन, यमनियमादि व्रते, होम,

पुत्रसंतती , पंचमहायज्ञ ,श्रौत व

स्मार्त यज्ञ, या सर्वांनी हे शरीर

मोक्ष मिळविण्यास योग्य होते. )

मनुस्मृतिः २ – २८

ज्या पौर्णिमेस श्रवण नक्षत्र

चंद्रासमीप असते , ती ‘ श्रावणी ’

पौर्णिमा ; व त्या पौर्णिमेस

करावयाचे (वर्षा ऋतुतील म्हणून )

वार्षिक धर्मकृत्य ‘ श्रावणी ’ म्हणून

प्रसिद्ध आहे . याचे पारिभाषिक

नाव ‘ उपाकर्म ’ असे आहे व याचा अर्थ

संस्कारपूर्वक वेदाच्या अध्ययनास

सुरवात करणे असा आहे .

हा विधी श्रावणी पौर्णिमेशिवा

पंचमी (नागपंचमी ) तसेच हस्त

नक्षत्रावरही करतात . सहा महिने

असे अध्ययन केल्यावर

माघी पौर्णिमेस ‘उत्सर्जन’ म्हणजे

वेदाध्ययन बंद ठेउन उपग्रंथ व शास्त्रांचे

अध्ययन करायचे असते . सध्या हे

दोनही विधी एकाच दिवशी म्हणजे

श्रावणीसच करण्याची पद्धत आहे .

आपले

प्राचीनतम वाड् मय

ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद व अथर्ववेद

यांच्या शाखासूत्रानुसार

श्रावणीच्या प्रयोगात थोडीफ़ार

भिन्नता असते.

आश्वलायनांच्या (ऋग्वेदियांच्या)

श्रावणीत ऋक्संहितेतील प्रत्येक

मंडलाच्या आद्य व अंत्य मंत्राने

आहुती देतात , दही व सातू भक्षण

करतात,नवे जानवे मंत्रवून

घालतात,वेदाध्ययनाची उजळणी कर

ऋषी व पितरांकरिता तर्पण करतात

व कृतज्ञता व्यक्त करतात.

या विधीकरिता नियम

म्हणजे

१ – ब्राह्मण्याचा अभिमान असणे व

कमीपणा न वाटणे.

२ – श्रावणीला धारण केलेले

यज्ञोपवित (जानवे)रोज स्वच्छ ठेवणे

व रोज १०८ वेळा तरी गायत्री जप

करणे.

३ – विविध उपक्रमाद्वारे

ज्ञातिबांधवांच्या संपर्कात राहणे.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247