श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंथा मर्या विटा ची 33वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..

Share news

(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )

श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटांची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कलश मंगल कार्यालय तासगाव रोड विटा येथे बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. सदर सभेस विटा पलूस तासगाव आरग सांगली मसूर कडेगाव या भागातील सभासद उपस्थित होते.

सभेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री ललित भई गांधी कोल्हापूर माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई व जैन मायनॉरिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहिले. तसेच श्री राजेन्द्र सी शाह कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष भारतीय जैन श्वेतांबर समाज महासंघ तसेच सुभाष भई शहा अध्यक्ष महाश्वेता जैन संघटना कराड व रमाकांत मालू उपाध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स सांगली. संस्थेचे चेअरमन व विटा जैन संघाचे अध्यक्ष माननीय श्री विलास भाई शहा व व्हॉइस चेअरमन डॉ. श्री अजित भाई शहा तसेच सर्व संचालक मंडळ शाखा सल्लागार मंडळ आणि सर्व सेवक वर्ग या सर्वांचे उपस्थितीत सभेस सुरुवात झाली. प्रथमता चंदन बाला ग्रुप व त्यांच्या शिक्षिका निरालीलौकिक शहा यांचे मार्फत नवकार मंत्राचे आयोजन केले गेले. त्यानंतर श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अहवाल सालात मयत झालेले सभासद तसेच माजी आमदार स्वर्गीय श्री अनिल भाऊ बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री रफिक आतार यांनी सभासदांना प्रशिक्षण देऊन वार्षिक सभेच्या कामकाजाची सुरुवात केली. त्यानंतर संस्थेचे संचालक माननीय श्री अभय मणियार यांनी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांची ओळख करून दिली. तसेच संस्थेचे व्हॉइस चेअरमन डॉक्टर श्री अजित रतिलाल शहा यांनी प्रास्ताविक मध्ये संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर यांनी मागील वर्षीच्या सभेचे प्रोसिडिंग वाचन केले त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभेचे अध्यक्ष श्री विलास कांतीलाल शहा यांनी अहवाल वाचन केले त्यामध्ये त्यांनी सभासद,भाग भांडवल, संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून प्रधान कार्यालय विटा येथे आहे. संस्थेचा शाखा विस्तार विटा पलूस तासगाव आरग सांगली या या ठिकाणी असून शाखांच्या प्रगतीचा आढावा मांडला. संस्थेची ठेव वाढ, कर्जवाढ, संचालक मंडळ कर्ज, गुंतवणूक, थकबाकी यामध्ये झालेली वाढ याचा सविस्तर वृत्तांत सभासदांपुढे मांडला. संस्थेने आज अखेर 80 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून 100 कोटी रुपयांचे उद्दिष्ट लवकरच संस्था पूर्ण करील असा विश्वास व्यक्त केला. तसेच संस्थेस अहवाल सालामध्ये ढोबळ नफा 1 कोटी 27 लाख रू झाला असून त्यामध्ये 49 लाख 10 दहा हजार रुपये तरतुदी करून निव्वळ नफा 78 लाख 57 हजार रू झाल्याचे सांगितले. त्याची नफा विभागणी करून सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यासाठी संचालक मंडळाने शिफारस केली. त्यास सर्व सभासदांनी मंजुरी दिली. संस्थेस अहवाल साली लेखापरीक्षण

वर्ग अ मिळाला सामाजिक कार्याचे वाचन केले संस्थेच्या प्रधान कार्यालय व शाखांमार्फत ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत आरटीजीएस,एन एफ टी, आय एम पी एस, गुगल पे, फोन पे, एसएमएस इत्यादी सुविधा देत आहोत.अहवाल सालात संस्थेचे सर्व सेवक वर्ग व पिग्मी प्रतिनिधी तसेच शासकीय व निम शासकीय अधिकारी यांनी संस्थेस केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. सभेचे अध्यक्ष मा. श्री विलासभई शहा यांनी त्यांचे केलेल्या अहवाल वाचनास या सभेतील सभासदांनी मंजुरी दिली.

यानंतर सभा विषय क्र.5, 6, 7,8, 9, 10, 12, 13,14, या विषयांचे सविस्तर वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर यांनी केले. सभेपुढील सर्व विषयास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. सभेचे कामकाज संपल्यानंतर इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर यामध्ये उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या सभासदांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये संस्थेचे संचालक श्री कांतीलाल मोहनलाल जोगड (किराणा व भुसार व्यापारी संघाचे अध्यक्षपदी) तसेच श्री प्रदीप राजाराम शहा रा. आरग यांची (व्यापारी महासंघ आरग चे अध्यक्षपदी) तसेच निकिता बोटकर व रोहित तारळेकर यांची शासकीय अधिकारी निवडीबद्दल व सौ ऋतुजा सौरभ शहा यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर सभासद, इतर मान्यवर व प्रमुख पाहुणे मा.श्री ललितभई गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेस मार्गदर्शनही केले. यानंतर संस्थेचे संचालक श्री सुनील भई शहा यांनी आभाराचे गोड काम केले. सौ. सेजल निलेश शहा व सविता राहुल शहा यांनी सभेच्या सूत्रसंचालनाचे काम केले. .

Local News 247