युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख पदी कांता ( भाऊ) राठोड यांची निवड .

Share news

जव्हार : सुनिल जाबर

युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र कांता (भाऊ राठोड ) यांना देण्यात आले .

पुणे कात्रज,वाघजाई येथील कांता (भाऊ) राठोड यांनी केलेल्या सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल कामाची दखल घेऊन त्यांना पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कांता (भाऊ) राठोड यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार साहेबांचे आभार मानले आहे तसेच संघटनेसाठी पुर्ण वेळ देऊन संघटना वाढीसाठी काम करणार आहे अशी भावना व्यक्त केली.