जय अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने नारीशक्तीचा सत्कार.

Share news

पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी

जय अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या संस्थापिका मंगलताई नागुल गेली 22 वर्षे महिलांना एकत्रित करून नवरात्री उत्सव साजरा करत आहेत. मंगलताई दरवर्षी उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेचा सत्कार करून सन्मानित करतात. यावर्षी वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका योगिताताई गोसावी यांचा मानाची पुणेरी पेशवाई पगडी डोक्यावर घालून सत्कार केला व सन्मानित केले. सामाजिक कार्याचे कौतुक तीच व्यक्ती करू शकते जी व्यक्ती स्वतः सामाजिक कार्य करत आहे.

मंगलताई गेली अनेक वर्षे उत्तम सामाजिक कार्य करत आहेत म्हणूनच मी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपण माझा सत्कार केलात आणि हा सत्कार माझा नसून मी करत असलेल्या सामाजिक कार्याचा आहे असे मनोगत योगिताताई गोसावी यांनी यावेळेस व्यक्त करून सर्व महिलांचे आभार मानले व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.