खिडकाळी गावात नवरात्रीमध्ये साजरा केला ‘संस्कारीत बाल-मेनू गरबा’.

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि.१६, कल्याण( ठाणे ): आगरी समाजातील खिडकाळी गावाचे आगरी शिरोमणी सन्मानित, ‘धवलारीन.. एक आगरी पुरोहित’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक,कवी नवनाथ ठाकुर हे एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व, मितभाषी, ‘सामाजिक बांधिलकी’ या नात्याने विविध आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक उपक्रम राबवून संस्कृती व धर्मामध्ये घुसलेले कर्मकांड (कचरा ) काढण्यासाठी सदैव कटिबध्द असणारे, अर्धांगवायूसारख्या भयंकर आजारावर मात करून आपल्या स्वास्थ्याची काळजी न करता नवनाथ ठाकुर हे सतत सक्रिय दिसतात.

कवी नवनाथ ठाकुर हे आपल्या घरी २०१६ मध्ये ‘संस्कारीत बाल-मेनू गरबा’ हा उपक्रम राबवत आहेत. सदर उपक्रम हा केवल ५-६ कुटुंबांपुरताच आहे. २०-२५ बालकांना सोबत घेऊन नवरात्रीचे नऊ दिवस रात्री ९:०० ते ११:०० पर्यंत कार्यक्रम असतात. रोज विविध खेळ,नृत्य,स्पर्धा,गरबा इ. कार्यक्रमाचे आयोजन असते. परिणामी बालकांमधील सुप्तगुणांना चालना मिळावी. तसेच आपल्या आतमध्ये अदृश्य शक्ती कार्य करते.याची जाणीव बालकांना व्हावी.या उद्देशाने सदर उपक्रम राबवित असतात.

आज शहरातील नवरात्रौत्सवात विकृती घुसली आहे. भोगवादाला नवरात्रौत्सवातून फाटा फुटत आहे. विकारी दृष्टी विष ओकत आहे. अश्लीलता निर्भयतेने नाचतांना दिसते. अश्लीलतेवर निर्बंध घालणारेही अश्लीलतेचे शिकारी होत आहेत. वयात आलेली मुलगी किंवा मुलगा या नवरात्रौत्सवातूनच भोगांचे शिकार होतांना दिसतात, अमर्याद विषय-वासना सैरावैरा पळतांना दिसतात. हे सर्व सर्वांनाच माहिती आहे. परंतु सर्वजण परिस्थितीचे आणि भोगांचे गुलाम झालेले आहेत. “कुंपणच शेत खाऊ लागलंय….”मग धाव घ्यायाची कुणाकडे? हिंदु म्हणून गर्वाने म्हणतो ना? मग हिन्दु उत्सवातली ही विकृती थांबवूया ना?थांबवू नाही शकत तर, कमीत कमी त्या विकृतीचे शिकार तरी नको होऊया.

कवी नवनाथ ठाकुर यांनी विकृत उत्सवांमध्ये घडविले संस्कृती दर्शन-

वर्षानुवर्षांच्या ह्या चिंतनातून कवी नवनाथ ठाकुर यांनी छोटासा प्रयोग केला..नवरात्री उत्सवाला दिलं एक विधायक वळण आणि साकारला एक नविन परंतु आगळा वेगळा”संस्कारीत बाल-मेनू गरबा”हा उपक्रम.

नऊरात्रीमध्ये रोज एक नविन मेनू प्रसाद म्हणून बालक ग्रहण करतात.तसेच रोज विविध बौध्दिक खेळांचे नियोजन केले जाते. प्रार्थना, देवीचा श्लोक, महिषासूरमर्दिनीस्तोत्राचे ५ श्लोकांचे पायरण, गरबा नृत्य, खेळ व प्रसाद अशाप्रकारे रोजचे कार्यक्रम असतात.

शेवटच्या दिवशी म्हणजे ११/१०/२०२४ रोजी नवव्या रात्री बक्षिस समारंभ हा कार्यक्रम नियोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असणारे प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी सन्माननीय प्रशांत पाटील यांना आमंत्रित केले होते.सन्मा.प्रशांत पाटील यांचं शिक्षण- BE (Mechanical), ME(Production), MBA Part time (Operations Management) असून ते सध्या माझगांव डॉक शीपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे Chief Manager- Submarine & Offshores Division (मुख्य प्रबंधक- पाणबुडी आणि अपतटीय विभाग) म्हणून कार्यरत आहेत. सन्मा.प्रशांत पाटील यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात सन्मा.प्रशांत पाटील यांचा शॉल, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा कवी नवनाथ ठाकुर यांच्या मातोश्री श्रीमती देवकूबाई ठाकुर यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कवी नवनाथ ठाकुर यांनी अतिशय विनोदी शैलीमध्ये केले. तसेच अतिथी म्हणून सन्मा.अरूण गोरपेकर यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते विजयी बालक व सहभागी बालक सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. यावर्षी सर्व बालकांनी महिषासूरमर्दिनी स्तोत्राचे पाच श्लोक पाठांतर केले. उत्कृष्ट वेशभूषा पारितोषिक कु.मनस्वी जाधव व कु.तनीष जाधव या दोघांना मिळाले. तर कोडं आणि शिघ्र वक्तव्येचे पारितोषिक कु.रक्षिता ठाकुर हिस मिळाले. बालकलाकार व उत्कृष्ट आयोजक,अन्नपूर्णा म्हणून महिला तसेच उपस्थित सर्व बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या.यावर्षीचा गरबा किंग-बालक द्रोण जयेश पाटील आणि गरबा क्वीन कु.श्रृती बाळाराम ठाकुर यांनी मान पटकावला. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. बालकांसाठी व दहावी विद्यार्थ्यांसाठी आकर्षक भेटवस्तू श्रीमती देवकूबाई ठाकुर, सौ.आचल ठाकुर, संतोष ठाकुर आणि सन्मा.प्रशांत पाटील यांनी दिल्या होत्या. या सर्वांचे हार्दिक आभार.

वर्गणी काढून नवरात्रौत्सव साजरे करणाऱ्या,डि.जे.बँन्ड यांच्या तालावर नाचणाऱ्या व त्यांनाच केन्द्रस्थानी ठेवून गरबा खेळणाऱ्या आजच्या नवरात्रौत्सवांपेक्षा संस्काराला उजळणी देणारा, हिंदु धर्माला शोभेल असा, संस्कृतीला जपणारा छोटासा”संस्कारीत बाल-मेनू गरबा”हा उपक्रम बालकांना अधिक प्रिय वाटू लागला आहे. यावर्षीही कवी नवनाथ ठाकुर यांनी ०३ आॕक्टोबर ते ११ आॕक्टोबर असे ९ दिवस ‘संस्कारीत बाल -मेनू गरबा’ यशस्वीपणे साजरा केला.दसऱ्याच्या शुभदिनी सकाळी नदीवर घटविसर्जन केले.

_👉येथे लौकिक दृष्टीने सजावटीचा झगमगाट नाही…परंतु संस्कारांची चमक आहे._

👉मंडप,विजेची रोशनाई नाही.परंतु बालकांच्या आनंदाचा प्रकाश आहे._

_👉वर्गणीतून मिळालेल्या वस्तू नाहीत..परंतु मेहनतीतून मिळणाऱ्या बक्षिसांचा खजिना आहे._

_👉डि.जे. बँड यांचा कर्कश आवाज नाही.परंतु देवीच्या मंत्रोच्चारांचा निर्घोष आहे._

_👉प्रत्येक्ष दुर्गामातेची मूर्ती नाही..परंतु जगदंबा मातेचे अस्तित्व मात्र आहे._

👉 _उपक्रमाचा मुख्य हेतूः_

नविन पिढीतील बालके सध्याच्या उत्सवांमधील विकृतीचे व कर्मकांडाचे शिकार बनू नयेत व उत्सवामधील खरा अर्थ समजुन उत्सवप्रेमी बनावी. हा मूलभूत हेतू ठेवून कवी नवनाथ ठाकुर यांनी “संस्कारीत बाल-मेनू गरबा”हा उपक्रम सूरू केला आहे. असे त्यांचे ठाम मत आहे. या उपक्रमाचे कुटुंबिय,सगे सोयरे,मित्र-मंडळी या सर्वांकडून कौतुक होत आहे. अशा छोट्याशा उपक्रमातून माता जगदंबेला कृतज्ञता पूर्वक नमस्कार करण्याचा प्रयत्न केला.