परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार मा . बापुराव माने यांची महेंद्र गोरे यांच्याशी निरगुडी येथे सदिच्छा भेट.

Share news

फलटणच्या पूर्व भागातील गोखळी गावचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते मा . बापुराव माने तिसरी आघाडीकडून विधानसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत.यासाठी त्यांनी फलटणच्या पूर्व भागात चांगलीच मोर्चे बांधणी केली आहे. त्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौरे चालू केले आहेत.त्याचबरोबर तालुक्यातील युवकांशी संवाद साधत आहेत.मा.खासदार छत्रपती संभाजी महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.राजू शेट्टी , प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा.बच्चू कडू आणि सहकारी मित्र पक्ष यांच्या तिसऱ्या आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मा .बापुराव माने यांनी होलार समाजाचे अभ्यासू युवक नेतृत्व महेंद्र गोरे यांची निरगुडी येथे भेट घेतली. होलार समाजाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी आशा मावळल्यानंतर तसेच यापूर्वी महेंद्र गोरे यांनी होलार समाज कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार.अशी केलेली घोषणा.या पार्श्वभूमीवर दोघांची झालेली भेट अत्यंत महत्वपूर्ण समजली जाते आहे.

यावेळी निलकुमार गोरे, पांडुरंग जाधव आणि मुकेश गोरे आदी उपस्थित होते