ई पीक पाहणी नोंदणीसाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ:उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे..

Share news

सिंदखेडराजा/ ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी अर्थात अँपद्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी आणखी सात दिवसाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे दिलेल्या मुदतीत राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

दिनांक १ ऑगस्ट २०२४ पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत खरीप हंगाम 2024 करिता शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी करण्यासाठी वेळ दिला होता. पण मागील काही दिवसापासून सर्वर डाऊन असणे , अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता ही पीक पाहणी करण्यासाठी आणखी सात दिवसाची मुदतवाढ म्हणजेच 23 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येणार आहे .

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे त्या पिकाची नोंदणी ई पीक पाहणी ॲपद्वारे करावे.ई पीक पाहणी न केल्यास यानंतर आपणास नैसर्गीक आपत्ती अनुदान, पीक विमा तसेच त्यासंबंधी शासनाचे लाभ ई पीक पाहणीच्या आधारे मिळणार आहेत याची नोंद घ्यावे. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली मदत ही “ई पीक पाहणी” च्या आधारे दिल्या जात आहे. .यापुढील अनुदान सुद्धा हे “ई पीक पाहणी”च्या आधारा वर दिल्या जाणार आहे.याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी त्यामुळे सिंदखेडराजा उपविभागामधील ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली नाही त्यांनी करून घ्यावी असे कळकळीचे आवाहन सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

या मुदतवाढीमध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपली पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी जेणेकरून सर्व शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे सिंदखेडराजा.