खोडाळा विभाग हायस्कूल ला मिळाले दहावी बोर्डाचे परीक्षा केंद्र ..

Share news

पालघर :सौरभ कामडी 

खोडाळा विभाग हायस्कुल ही खोडाळा विभागातील मध्यवर्ती शाळा असून या शाळेस दहावी एस एस सी बोर्डाचे परिक्षा केंद्र म्हणून शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे.

मागील वर्षी पर्यंत शाळेची अत्यंत दुरवस्था झालेली होती. स्पार्क फाउंडेशन या सामाजिक संस्थेने शाळेचे सर्वंकष नूतनीकरण करून शाळा अद्ययावत केली. त्यामुळे एका वर्षातच शाळेने भरारी घेतली आहे.

शाळेला परीक्षा केंद्र प्राप्त झाल्याने डोलारा,आडोशी व इतर दूरस्थ गावातील विद्यार्थ्यांचा कारेगाव ला जाण्याचा वेळ व प्रवास खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच परिक्षेआधी कारेगाव ला बेंच व इतर साहित्य ने आण करण्याच्या व्यापातून शाळांची सुटका होणार आहे.

याबाबत संबंधित शाळांचे शिक्षक,पालक व ग्रामस्थ समाधान व्यक्त करत असून स्पार्क फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेचे नूतनीकरण झाल्यानंतर लगेच शिक्षण विभागाला अर्ज केला. विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली व परीक्षा केंद्राच्या सर्व निकषांत शाळा बसत असल्याने परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली. विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचे समाधान आहे.