संत कबीर सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील संत कबीर सार्वजनिक वाचनालय विझोरा येथे आज १५ आकटोबर रोजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली

दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला होता त्यांनी त्यांच्या बालपणी भरपूर कष्ट केले. 1960 मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले फायटर पायलट होण्याची त्यांचे बालपणीची स्वप्न होते. पदवीनंतर डी आरडीओ मध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले ते 1969 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) मध्ये रुजू झाले अंतराळ विज्ञानातील त्यांच्या कौशल्यामुळे ती भारतीय क्षेपणास्त्र पुरुष म्हणून लोकप्रिय झाले ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.

“स्वप्ने तीन असतात जी आपण झोपेत बघतो तर खरी स्वप्न ती असतात ती आपली झोप उडतात” असे म्हणणारे भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आपण मिसाईल मॅन ओळखतो त्यांचा आज जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम वाचनलयाचे अध्यक्ष श्री हर्षदीप मस्के यांनी ग्रंथाचे पूजन करून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले तसेच वाचक दिनेश म्हस्के यांनी पुस्तका बद्दल माहिती देत पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचे मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे असे पुस्तकाची माहिती दिली कार्यक्रमाला बरेच वाचक व वाचनलयाचे संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल उषा म्हस्के यांनी केली तर वाचनालयचे सचिव कडूबा म्हस्के यांनी सर्वांचे आभार मानून अल्प उपोहार वाटप केला