अर्धांग वायूचा झटका आलेल्या कर्मचाऱ्याचा विमा न उतरवल्याप्रकरणी छावा क्रांतिवीर सेना आक्रमक आमरण उपोषण केले सुरु..

Share news

रात्रपाळी कामावर असलेल्या कामगाराला अर्धांग वायूचा झटका आल्यानंतर या कामगाराच्या परिवाराने प्रशासनाकडे कामगार विम्याची विचारणा केली असता प्रशासनाने कामगारांचा कोणताही विमा तसेच भविष्य निर्वाह निधी काढला नसल्याची माहिती दिली.

अंबड औद्योगिक वसाहतीतील अमेय इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि रॅपिड ॲक्शन फोर्स सिक्युरिटी येथे सोमनाथ थोरात हे मागील चार वर्षापासून ठेकेदाराच्या माध्यमातून सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे. सुरक्षारक्षक बोर्ड कायद्याचे उल्लंघन करून कंपनी आणि ठेकेदार हे या कर्मचाऱ्यास बारा बारा तास काम करूनही तुटपुंचे मानधन देत आहे.

त्यातच कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी तसेच कामगार विमा उतरविणे बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारचा विमा उतरविण्यात न आल्याने

मुख्य अधिकारी कामगार राज्य विमा महामंडळ कार्यालया समोर, पंचादिप भवन, सातपुर येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आलं यावेळी

अमेय इंडस्ट्रिज आणि रॅपीड अॅक्शन फोर्स सुरक्षा रक्षक एजन्सी यांचे वर चौकशी करुन कामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा

अन्याय ग्रस्त कामगार सोमनाथ थोरात यांना दवाखान्यासाठी लागलेला खर्च संपूर्ण भरपाई मिळावा

कामगार सोमनाथ थोरात यांना ४ वर्षाचा कामगार भविष्य निधी (पी.एफ) मिळावा. कामगार सोमनाथ थोरात यांच्या तब्येतीत सुधारणा होईपर्यत संपुर्ण मेडिकल रजा भरुण मिळावी. तक्रार अर्ज दाखल करूनही कोणत्याही प्रकारची कारवाही न केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली…

यावेळी आमरण उपोषण करते योगेश पाटील, संतोष अडांगळे, दत्ता पाटील कवडे उपस्थीत होते.

Local News 247