विभागीय कृषी सहसंचालक,श्री किसन मुळे यांची संचालक पदी नियुक्ती..

Share news

बुलढाणा/सुरेश हुसे

विभागीय कृषी सहसंचालक अमरावती येथे तीन वर्षापासून सेवा देत असलेले श्री किसन मुळे यांची पदोन्नतीने कृषी आयुक्तालय पुणे येथे, कृषी संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे येथे पदस्थापना झालेली आहे. श्री किसन मुळे यांची अतिशय शिस्तबद्ध व कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून ओळख या विभागामध्ये निर्माण झाली होती. त्यांनी अमरावती येथे पदभार घेतल्यापासून अमरावती विभागामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन स्वतः शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या काय अडीअडचणी आहेत व शासनाचा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याकडून चांगल्या प्रकारे करून घेतले. श्री किसन मुळे हे शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय अधिकारी म्हणून निर्माण झाली होती.

त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये शासनाच्या विविध योजना हा शेतकऱ्यापर्यंत चांगल्या प्रकारे रुजवण्याचे काम केले. ते नेहमी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन भेट देणारे अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये अतिशय चांगल्या रीतीने काम केले व आपली जबाबदारी ही पूर्णपणे पार पाडली .