ई-पीक पाहणीची अट शिथिल करून कापूस व सोयाबीन पिकाच्या भाव फरकाच्या अनुदानाची रक्कम सरसकट सर्वच शेतकऱ्यांना देऊन अर्थसहाय्य करा…!

Share news

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा मातृतिर्थ / तालुक्यातील सर्वच भागामध्ये काही शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली परंतु त्याची नोंदी सातबारा झाली नाही त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील बरेच शेतकरी हे ई पिक पाहणी करेल असुन सुद्धा सोयाबीन आणि कापसाच्या भावकंपाकाच्या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांजी खेडेकर नाना यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे सरसकट सर्व शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे पत्र दिले आहे त्यांनी त्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की माझ्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकरी मागील काही वर्षापासून निसर्गाच्या व अवकृपेने शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे आपले शासन वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत देऊन थोडा धीर देत आहे परंतु शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करेल असुन सुद्धा सातबारावर नोंद नसल्यामुळे ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये काही शेतकऱ्यांचे ई पिक पाहणी करेल असून सुद्धा यादीमध्ये नाव समाविष्ट नव्हते त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता हे सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या लक्षात येतच त्यांनी ई पिक पाहण्याची अट शिथिल करून कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी एका पत्राद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे केली आहे व ई पिक पाहणीचे आठ शिथिल करून सरसकट कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना भाव फरकाचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी सुद्धा पत्रामध्ये केली आहे.

Local News 247