खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या मानाची पैठणी विजेता ठरल्या आरती साईनाथ भोईर..

Share news

ठाणे : विनोद वास्कर

दि. १३, शिळफाटा (ठाणे) : ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी जय भवानी तरुण मित्र मंडळ शिळगाव ता.जि. ठाणे तर्फे दुपारी १२ वाजता दुर्गा मातेची स्थापना मंडळाचे सदस्य वल्लभ मधुकर पाटील आणि त्यांच्या पत्नी मिलन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुर्गा मातेची पूजा अर्चना आरती करण्यात आली.

या मंडळाची स्थापना १९९० साली झाली. या मंडळाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे मंडळ स्थापन करण्यासाठी शिळगावातील ज्या व्यक्तीने मोठं योगदान दिले आहेत ते आहेत स्वर्गीय धोंडू मारुती आलिमकर व स्वाध्याय परिवार तसेच या सार्वजनिक उत्सवासाठी ज्यांनी जागा दिली ते म्हणजे स्वर्गीय चाहू लक्ष्मण आलिमकर, २७ वर्ष मंडळाच्या अध्यक्ष पदावर असताना ज्यांनी नीट नियमाने काम केले ते स्वर्गीय रामचंद्र कृष्ण आलिमकर, तसेच जे दोन सदस्य असे होऊन गेले की त्यांनी आहोरात्र नवरात्र उत्सवासाठी झटले ते म्हणजे स्वर्गीय शांताराम गजानन आलिमकर व स्वर्गीय अनंता कृष्णा भोईर, या मंडळासाठी नेहमी सहकार्य करणारे त्यावेळी ग्रामस्थ सखाराम रामा पाटील, शांताराम आलिमकर, रमेश आलिमकर, सिताराम आलिमकर, महेंद्र आलिमकर, कमळाकर आलिमकर, मोरेश्वर आलिमकर, रघुनाथ भोईर, रामचंद्र भोईर, रघुनाथ आलिमकर, हरिचंद्र आलिमकर, बळीराम भोईर, स्वर्गीय परशुराम भोईर, अभिमन्यू भोईर, मारुती भोईर, सखाराम बुधाजी आलिमकर, नरेश आलिमकर, परशुराम आलिमकर, बबन म्हात्रे, मधुकर आलिमकर, स्वर्गीय मधुकर भोईर, स्वर्गीय राजाराम आलिमकर, रमेश भोईर, अनिल पाटील, आत्माराम भोईर, बालाजी पाटील, धनेश काठे, स्वर्गीय पांडुरंग म्हात्रे, रतन म्हात्रे, शनिवार वास्कर,भगवान वास्कर, रमेश काठे, सज्जन पाटील, बबन भोईर, स्वर्गीय नकुल भोईर, स्वर्गीय गौतम पावशे,मंडळ स्थापन करण्यासाठी विशेष सहकारी करणारी ही सर्व ग्रामस्थ होते तसेच शिळगावातील ठाणे महानगरपालिकेमध्ये शाला क्रमांक ८१ मध्ये शिक्षक असलेले स्वर्गीय तुकाराम राहू बिदले गुरुजी यांचे सुद्धा खूप मोठं योगदान होते त्यावेळी.

स्वर्गीय रामचंद्र आलिमकर यांच्यानंतर दुसरे अध्यक्ष झाले ते रोहिदास आलिमकर, उपाध्यक्ष स्वप्निल पावशे, उपाध्यक्ष साईनाथ भोईर, सचिव प्रशांत भोईर, उपसचिव जयेश दातिलकर, खजिनदार शिवा आलिमकर, सल्लागार संतोष भोईर, कार्यकारी सदस्य सुंदर आलिमकर, अनिल भोईर, महेश काठे, वल्लभ पाटील, कुणाल आलिमकर, रितेश पाटील, नितेश पाटील, वैभव आलिमकर, प्रथमेश आलिमकर, हे सर्वजण दहा दिवस कार्य व्यवस्थित पडावे म्हणून दिवस-रात्र मेहनत घेत असतात. तसेच त्यांना सहकार्य करत असतात अशोक काठे, निलेश आलिमकर, विशाल आलिमकर, दिनेश काठे, प्रेमनाथ आलिमकर, दिलीप आलिमकर, मनोज काठे, सखाराम भोईर, लालचंद्र आलिमकर, जयेंद्र भोईर, अनंता म्हात्रे, राघो भोईर, विनोद भोईर, आशिष भोईर, सचिन आलिमकर, अनिल साळवी, तेजस पाटील, योगेश आलिमकर हे सर्वजण मंडळाला सहकार्य करत असतात.

चौकट : गुरुवारी ०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. श्री माऊली प्रसादिक भजन मंडळ (निलजे) गायक : जयदास बुवा खंडाळे, पखवाज रंजीत बुवा खंडाळे आणि इतर त्यांचे साथ देणारे सदस्य यांनी भजन सादर केले. शिवशक्ती गायन पार्टी खार्डी यांनी बायांचे गाणी सादर केले. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी प्रवचन सेवा ह.भ.प..निवृत्ती महाराज मुंडे देसाई यांनी सुश्राव्य प्रवचन सादर केले. शनिवारी ५ ऑक्टोंबर रोजी लहान मुलांचे डान्स कार्यक्रम झाले.

शुक्रवारी ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता होम हवन करण्यात आले.शनिवारी १२ ऑक्टोंबर रोजी फॅन्सी ड्रेस कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच प्रत्येक दिवशी गरबा आणि बक्षीस समारंभ घेण्यात आले. आलेल्या सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या, आणि राजकीय नेत्यांचे,ज्येष्ठ नागरिकांचे, आणि दहावी ते बारावी मध्ये चांगल्या मार्काने पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. रविवारी १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी दसऱ्या दिवशी होम मिनिस्टर चे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णा इस्टेट परिवार व सेंट्रल ग्रुप यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालकाची भूमिका करण काळण यांनी पार पाडली. या कार्यक्रमासाठी शिळगावातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतले. खेळ रंगला पैठणीचा खेळात भाग घेणाऱ्या सर्व महिलांना गिफ्ट आयोजकांकडून देण्यात आले. प्रथम पारितोषिक साठी मानाची पैठणी ठेवण्यात आली होती. आणि नऊ महिलांना नऊ साड्या आयोजकांकडून ठेवण्यात आल्या होत्या. विजेता झालेल्या महिलांना मंडळाकडून समानचिन्ह देण्यात आले.

होम मिनिस्टर या कार्यक्रमात अनेक प्रकारचे खेळ करण काळण यांनी महिलांकडून खेळून घेतले. तळ्यात मळ्यात, उखाणे, फुगे फुगवणे आणि ते जोडीने घेऊन खुर्चीवर ठेवणे आणि जोडीदाराने ते फोडणे, तीन चार चे ग्रुप बनवले, फुग्यामध्ये हवा भरून कागदाचे रिकामे ग्लास फुग्यातून हवेतून टेबलावरून खाली पाडणे, फुकटची मेकअप, एका वाटीमध्ये खाली नाणे ठेवून त्याच्यावरती तांदळाच्या पिठाचा थर ठेवण्यात आले. महिलांनी ते आपल्या फुकीतून पीठ उडवणे आणि जोपर्यंत नाणे दिसत नाही तोपर्यंत फुक मारणे, ज्या महिलेने फुक मारून नाणे दिसेपर्यंत फुक मारली ती महिला आहे आरती साईनाथ भोईर मानाची पैठणी विजेता ठरली. सोनाली प्रेमनाथ आलिमकर, रस्मिता आकाश आलिमकर, परिधी महेश भोईर, गीता साईनाथ आलिमकर, दीपिका मनोज पाटील, येवंती हेमंत आलिमकर, संजीवनी पप्पू काठे, कृष्णा तानाजी कांबळे, रूपा रुपेश आलिमकर या सर्व महिला साड्या विजेता ठरल्या.

१३ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुर्गा मातेचे विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. गुलाल उधळत , फटाक्याची अतिशय बाजी, बँड वाजवत,भक्त नाचत गाजत दुर्गा मातेला निरोप देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. रात्री आठ वाजता शिळगांवातील गावदेव तलावात विसर्जन करण्यात आले.