अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटला; सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या मुळे चालकाचा जिव वाचला..

Share news

अकोला प्रती – अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर MP 13 GA 8841 क्रमांकाचा ट्रक इंदौर वरून बेंगलोरला साबण बनवण्याचे केमिकल घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडचे चाक निखळल्यामुळे सदर ट्रक रात्री ११:०० वाजता भोसला इंजिनिअरिंग कॉलेज जवळ रस्त्यावरील डिवायडर वर पलटी झाला. त्यामुळे डिझलची टाकी पुर्ण फुटली असुन डिझेल व केमिकल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले होते.

सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. चालकाला किरकोळ मुक्कामार लागला असुन तो सुखरूप आहे. सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे रात्री ११:०० वाजता आपल्या निंबि मालोकार येथे कामावर जात असतांनी त्यांना हा पलटी झालेला ट्रक दिसला त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ चालकाला सुखरूप बाहेर काढले.त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247