आदिवासी समाजाच्या विविध मागण्या संदर्भाबाबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित.!

Share news

 शिरपूर / प्रतिनिधी तालुक्यातील आदिवासी समाज आणि विविध सामाजिक संघटना यांनी येथील तहसील कार्यालया समोर विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन मागील ६ ऑक्टोंबर २०२४ पासून शिरपूर तालुक्यातील विविध संघटना ह्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले होते. शासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आला होता.

ह्या आंदोलनात प्रमुख मागणीत १७ संर्वगातील रखडलेली पेसा भरती ताल्काळ भरती करण्यात यावी, धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एस.टी प्रवर्गात आरक्षण न देता त्यांना स्वंतत्र आरक्षण द्यावे, एस.आर.बी. इंटरनेशनल शाळेत इ. ९ वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला अमानुषपणे बेदम मारहाण करणारे वार्डन मनोज देवरे व शाळा प्रशासनावर एट्रॉसिटी व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद होवून सह तात्काळ अटक करून शाळेचे मान्यता रद्द करण्यात यावी, शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातील दंगलीतील खोटे गुन्हे झालेल्यासह संशयीत युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, जिल्ह्यातील शासकिय आदिवासी मुला मुलींचे वसतीगृहातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावी, नामांकित इंग्रजी शाळेचे सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे, तालुक्यातील वनजमिनी दावे सर्व अपात्र झालेल्या आदिवासी बांधवांचे वनजमिनी दावे सर्व पात्र करून सातबार देण्यात याचे, तालुक्यातील स्वस्त राशन दुकानदार वेळेवर रेशन धान्य देत त्यांनी शासनाच्या जीआरनुसार प्रत्येक गावात रेशन धान्य वाटप नविनसह विभक्त करण्यात यावे, पंडित दीन दयाळ संयम योजनेचे रक्कम मध्ये वाढ करण्यात यावी, तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी १९५० पुरावा मागितला जातो जातीचा दाखलाच्या आधारावर दाखले देण्यात यावे, तालुक्यातील आदिवासी क्रातीकारक याचे स्मारक उभारण्यासाठी एखाद्यी जागा उपलब्ध करण्यात यावी, तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानाठी जागेसह सभागृह बांधण्यात यावे या प्रमुख मागण्या आदिवासी संघटनांनी केल्या होत्या.

शिरपूर शहरातील तहसील कार्यालयासमोर सुरू झालेल्या ह्या धरणे आंदोलनात तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

हे बेमुदत आंदोलन शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विविध मागण्यांसाठी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, जय आदिवासी युवा शक्ती – जयस, रावण राजे फाउंडेशन, महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (माडा) शाखा शिरपूर व शिरपूर तालुक्यातील आदिवासी संघटनांचे पुढाकार घेतलेल्या ह्या बेमुदत आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे यशस्वी वाटचालीने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे असे घोषित करण्यात आले.

उपरोक्त संघटना व शिरपूर तालुक्यातील धुळे – नंदुरबार जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील अनेक राजकीय, प्रशासकीय, सामाजिक योद्धे ह्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे हे आंदोलन यशस्वी झाले असे घोषित करण्यात आले.!

Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247 Local News 247